आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुश, बिनधास्त राहण्याची कला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला किसमिस खायला आवडते; परंतु आयुष्यात पहिल्यांदा वेगळ्या पद्धतीने किसमिस खात आहे. मी सतर्कता आणि एकाग्रतेने असे करतो. चांगले आरोग्य आणि आनंदी राहण्यासाठी चित्त एकाग्र करण्याकडे कल वाढत आहे. मी अलीकडे तणाव कमी करण्यासाठी माइंडफुलनेस बेस्ड् स्ट्रेस रिडक्शन (एमबीएसआर) प्रशिक्षण घेत आहे. मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकलेले शास्त्रज्ञ जोन कबाट जिन यांनी हा कोर्स तयार केला आहे. सुमारे तीस देश आणि अमेरिकेत एक हजार एमबीएसआर इन्स्ट्रक्टर लोकांना ध्यानासह समजूतदारपणा, एकाग्रता आणि सतर्कता कशी साधावी याचे धडे देत आहेत.
तंत्रज्ञानाने आपले लक्ष लहान सहान गोष्टींमध्ये वाटून टाकले आहे. आपण टीव्ही पाहत अनेक कामे करतो. ट्रॅफिकमध्ये अडकलो असताना किराणा दुकानदाराला काही ऑर्डर देत असतो. गॅजेट्सच्या मदतीने एका वेळी अनेक ठिकाणी असतो. एकाग्रतेच्या मदतीने आपण बरेच काही आणखी चांगले करू शकतो. अनेक चिकित्सक चिंता, काळजीग्रस्त रुग्णांसाठी याचा वापर करतात. एकाग्रतेची अवस्था प्राप्त करण्यासाठी ध्यान आवश्यक तत्त्व मानले जाते. जे काम आपली हाती आहे ते पूर्ण एकाग्रतेने करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. पौर्वात्त्य देशांमधील तत्त्वज्ञानात एकाग्रता, ध्यान या गोष्टींवर भर दिला आहे.
कबाट जिन आणि इतर लोक माइंडफुलनेस वाढवताना अध्यात्माचा उल्लेख करत नाहीत. ध्यान म्हणजे एक मांसपेशीसारखे असल्याचे ते सांगतात. जसे कोणतीही मांसपेशी व्यायामाने मजबूत होते, तशीच स्थिती एकाग्रतेची आहे. अभ्यासाद्वारे ध्यानदेखील दृढ केले जाऊ शकते. मेंदूच्या स्थितीच्या अनुकूल कल असण्याच्या क्षमतेचा शास्त्रीय अभ्यास होत आहे. न्युरोप्लास्टिसिटी नामक स्थितीने स्पष्ट होते की, मेंदूच्या व्यायामाने ब-यापैकी परिणाम समोर येतात. त्यामुळे माइंडफुलनेसला तात्पुरते किंवा अवास्तव म्हटले जाऊ शकत नाही.
माइंडफुलनेस किंवा एकाग्रतेच्या अभ्यासाने शास्त्रीय आधारामुळे व्यवसायाचे रूप घेतले आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार 2007 मध्ये अमेरिकन लोकांनी एमबीएसआरसह एकाग्रतेशी संबंधित पर्यायी चिकित्सा पद्धतीवर चार अब्ज डॉलर खर्च केले होते. नवीन आकडेवारी यंदा जाहीर होईल. माइंडफुलनेसवर पत्रिका आणि पुस्तके प्रकाशित होत आहेत. अनेक स्मार्ट फोन अ‍ॅप बाजारात दाखल झाले आहेत. जनरल मिल्स कंपनीच्या माजी उपाध्यक्षा जेनिस मार्तुरानो कंपनीत माइंडफुलनेसवर कॅटस्किल्स कार्यक्रम चालवित असत. 2006 मध्ये त्याच्या सुरुवातीनंतर जनरल मिल्सचे सुमारे 600 कर्मचारी माइंडफुलनेसच्या वर्गात सामील झाले आहेत. कंपनीच्या मिनियापोलिस कॅम्पसच्या प्रत्येक भवनात ध्यान करण्यासाठी एक खोली आहे.
मार्तुरानोने 2011 मध्ये कंपनी सोडली आणि इन्स्टिट्यूट फॉर माइंडफुल लीडरशीप स्थापन केली आहे. दावोसमध्ये 2013 मध्ये माइंडफुलनेसवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात मोठ्या संख्येने राजकीय नेते, बिझनेस लीडर्स सहभागी झाले होते. ते सांगतात, बहुतांश लीडर्स उशिरापर्यंत काम करत सतत संपर्कात राहण्याच्या स्थितीला तोंड देत होते. कोणते काम किंवा योजना महत्त्वाचे आहे हे ठरवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. संशोधकांनी पाहिले की, एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या क्षमतेवर परिणाम जाणवत होता. सतत आणि भरभर एखाद्या काम करताना दुसरे एखादे काम करणारे विद्यार्थी किंवा कर्मचारी खूप सा-या चुका करतात. कमी महत्त्वाची माहिती ते वेगळी करू शकत नाहीत. नव्या माहितीनुसार निम्म्यापेक्षा जास्त अमेरिकन प्रौढ कर्मचारी वीकेंडला कामासंबंधी मेसेज चेक करतात. दहापैकी चार कर्मचारी सुटीत असे करू शकतात. जेव्हा तुमचे बॉस आणि कंपनी कर्मचा-यांना माहीत असते की, तुम्ही स्मार्टफोनवर आहात तेव्हा तुम्ही कुठेच स्वस्थ बसू शकत नाहीत.
सिलिकॉन व्हॅलीत माइंडफुलनेस वर्ग आणि संमेलनांची धूम असते. 2009 मध्ये टेक लीडर्स, मॅनेजर्ससाठीच्या विस्डम 2.0 वार्षिक संमेलनात 325 जण सहभागी झाले होते. यंदा दोन हजारपेक्षा जास्त सहभागाची अपेक्षा आयोजकांना आहे.
तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा ध्यानधारणेशी संबंध
० आयट्युन्सने माइंडफुलनेस व ध्यानावर अनेक अ‍ॅप सादर केले आहेत. माजी बौद्ध भिक्खू अँडी पुडिकोम्ब यांची कंपनी हेडस्पेसने याच नावाने एक अ‍ॅप बनवले आहे.
० अ‍ॅपद्वारे कंपनी मोफत कंटेन्ट देते. जिम मेंबरशिपच्या नावाने मेंदूसाठी वेब व्हिडिओची सिरीज विकते.
० व्हिडिओमध्ये पुडिकोम्ब एकाग्रता आणि चिंतनाच्या टिप्स देतात. पुडिकोम्ब सांगतात, आपल्याला वापराची योग्य पद्धत माहीत असेल, तर स्मार्टफोनपासून काहीच हानी नाही.
० एमबीएसआर कार्यक्रमाचे जनक जोन कबाट जिन यांच्या लक्षात आले की, बौद्ध भिक्खूंच्या ध्यानमार्गाद्वारे तात्पुरत्या वेदना शमवल्या जाऊ शकतात.
० जिन यांनी तीन वैद्यकीय सेवकांच्या मदतीने माइंडफुलनेस आणि ध्यानावर आधारित क्लिनिक काढले.
० जिन यांच्या क्लिनिकमध्ये ट्रेनिंगमुळे अनेक रुग्णांनी वेदना कमी झाल्याचा अनुभव घेतला. कित्येक रुग्णांच्या वेदना कमी झाल्या नाहीत. मात्र, आजारपणाचा तणाव त्यांना सहजपणे सहन करता आला.
० संशोधकांच्या लक्षात आले की, ध्यान आणि एकाग्रतेच्या प्रशिक्षणाने रक्तदाब नियंत्रणात राहतो. शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते.
० ध्यान केल्याने मेंदूच्या संरचनेवर परिणाम होते. मेंदूविकारतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कमी ध्यानधारणा करणा-यांची स्मरणशक्तीदेखील चांगली असते. मेंदू अकारण अस्थिर नसतो.
० विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या शोधपत्रिकेत सांगण्यात आले आहे की, 10 हजार तास ध्यान करणा-या भिक्खूंचा मेंदू इतरांपेक्षा जागरूक आढळला.