आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धीमुळे सॅन फ्रान्सिस्कोची ओळख टिकवण्यासाठी धडपड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात विविध वर्गांमधील तणाव धुक्यासारखा पसरला आहे. शिक्षक, कुक आणि संगीतकार यांनी गाशा गुंडाळला आहे. कारण तेथील घरभाडे अव्वाच्या सव्वा झाले आहे. टूबीएचके फ्लॅटचे भाडे महिन्याला 6000 डॉलर आहे. माध्यमिक शिक्षण घेतलेले लोक शहर सोडून जात आहेत. अधिक कमाई करू शकणारे पदवीधर टिकून आहेत. लोकसंख्येत आफ्रिकी अमेरिकनांचे प्रमाण सहा टक्के आहे. हे प्रमाण 1980 च्या तुलनेत निम्मे आहे. सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेचा स्वर्ग बनत चालल्याचा धसका स्थानिकांनी घेतला आहे. अमेरिकेचे इतर काही प्रमुख शहरे अशाच स्थितीचा सामना करत आहेत. ब्रुक लिंगस संस्थेत सीनियर फेलो अ‍ॅलन बेरुबे सांगतात, सॅन फ्रान्सिस्को, सिएटल आणि बोस्टनसारख्या शहरांत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत की या शहरांमध्ये सर्व प्रकारचे लोक सहज पोहोचू शकतात का?
सॅन फ्रान्सिस्कोत विषमतेचा गंभीर दबाव आहे. येथे मध्यमवर्गीयांचे उत्पन्न 73 हजार डॉलर आहे. हे अमेरिकन सरासरीच्या 50 टक्के अधिक आहे. वाढता विकास आणि कमी पडत जाणा-या जागेमुळे संकट ओढवले आहे. पुरेशी प्रगती झालेल्या तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल वंचित लोकांमध्ये नाराजी आहे. सेन जोसच्या आसपासच्या टेक सेक्टरचे कामगार शहराच्या खाडी भागात येत आहेत. स्थानिक लोक बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून विरोध व्यक्त करू लागले आहेत. एका बॅनरवर लिहिले आहे : सॅन फ्रान्सिस्को जुन्या रहिवाशांच्या तुलनेत नव्या टेक वर्गाला प्राधान्य देत आहे. दुसरा एक बॅनरवर आहे की, सॅन फ्रान्सिस्को लोकांसाठी आहे, गुगलसाठी नाही.
सॅन फ्रान्सिस्कोच्या मार्केट स्ट्रीटवर परिवर्तनाची चिन्हे सर्वत्र दिसतात. अपूर्ण अवस्थेतीत गगनचुंबी इमारतींच्या भोवती क्रेन दिसू लागले आहेत. बेघर लोक सामान बांधू लागले आहेत. टेन्थ स्ट्रीटवर ट्विटरचा सुपरिचित ब्ल्यू-बर्ड लोंबकळत आहे. वादग्रस्त कर सूट मिळाल्यानंतर ट्विटरचे कार्यालय 2012 मध्ये मिडमार्केट क्षेत्रात आले. आता कर्मचारी दुप्पट झाले आहेत. नोव्हेंबर 2013 मध्ये ट्विटरचा आयपीओ आल्यानंतर रात्रीतून 1600 कोट्यधीश झाले. त्यात काही खाडी भागातील होते.
सॅन फ्रान्सिस्कोत 1800 टेक कंपन्यांनी स्थानिक अर्थव्यवस्था बदलली. कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कलेचे अर्थतज्ज्ञ एनरिको मोरेटी यांनी 220 मेट्रो क्षेत्रात एक कोटी कर्मचा-यांच्या विश्लेषणातून अंदाज केला की, प्रत्येक टेक जॉबने पाच इतर जॉब्सला आधार मिळतो. शहरात बेकारीचे प्रमाण 4.8 टक्के आहे. हे दोन वर्षांपूर्वी दुप्पट होते. मात्र, या यशाची किंमतही मोजावी लागत आहे. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले शहर फक्त 127 चौरस किमीत पसरलेले आहे. न्यूयॉर्क त्यापेक्षा सहापट मोठे आहे. मोरेटो सांगतात, सॅन फ्रान्सिस्को या बाबतीत अयशस्वी राहिले आहे. नवी घरे कमी झाल्याने प्रॉपर्टीच्या किमती प्रचंड प्रमाणात
वाढल्या आहेत.
डिसेंबर 2012 ते डिसेंबर 2013 दरम्यान पश्चिम खाडी भागात 26,700 नवे जॉब जोडले, मात्र 6000 नव्या घरांचेच काम सुरू आहे. गेल्या वर्षी घरांच्या किमती 16 टक्के वाढल्या आहेत. पॅसिफिक हाइट्स क्षेत्रात जानेवारीच्या सुरुवातीला एका घराची सरासरी किंमत एक कोटी 25 लाख डॉलर होती. या भागात ऑरॅकलचे लॅरी एलिसन आणि अ‍ॅपलचे डिझाइन गुरू जोनाथन इवे यांसारखे अब्जाधीश राहतात. शहरातील इतर भागांत लोकनिर्माण भवन निर्मिती नियम डावलून हवे तसे घर बनवत आहेत. बाजारमूल्यापेक्षा कमी भाडे देणा-यांना घालवले जात आहे. वर्षभरात घर खाली करणा-यांचे प्रमाण 123 टक्क्यांनी वाढले आहे. प्रॉपर्टीसह इतरही गोष्टी महागल्या आहेत. 295 मिमी ड्रिपल कॉफी तीन डॉलरला मिळते. एका रेस्टॉरंटमध्ये चार डॉलरला टोस्ट विकले जाते. लोक स्मार्टफोनने लिफ्ट, साइड-कार किंवा उबेरसारख्या कंपन्यांच्या टॅक्सी बोलावू शकतात. बिझी टाइममध्ये उबेरचा किमान दर 40 डॉलर आहे. शहरात आलेले नवे लोक आणि मूळ रहिवाशांमध्ये सकाळी बसस्टॉपवर तणाव दिसून येतो. गुगल बसच्या नावाने प्रसिद्ध वायफायने लेस डबल-डेकर बसमध्ये गुगल, फेसबुक,
लिंक्ड्-इन आणि इतर टेक कंपन्यांचे कर्मचारी दक्षिण भागातून सिलिकॉन व्हॅलीपर्यंत जातात. हे लक्झरी वाहन सामाजिक स्तराचे प्रतीक आहे. यातील प्रवासी स्थानिकांच्या निशाण्यावर आहेत.
टेक कंपन्यांच्या बसच्या प्रत्येक स्टॉपला एक डॉलर आकारण्याचा सिटी कौन्सिलचा विचार आहे. मात्र, यामुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष आणखी उफाळला. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात मार्केट स्ट्रीटवर लोकांनी प्रदर्शन केले. फेसबुक व गुगलकडे जाणा-या गाड्या लोकांनी अडवल्या. बॅनरवर लिहिले होते : एक डॉलरने विस्थापन थांबणार नाही.
सॅन फ्रान्सिस्को आपली ओळख टिकवण्याची धडपड करत आहे. व्हेंचर कॅपिटॅलिस्ट टॉम पर्किस यांनी यशस्वी लोकांच्या विरोधात उसळलेल्या लाटेची तुलना नाझींनी यहुदींचा केलेल्या द्वेषाशी केली आहे. मेयर एड ली स्वीकारतात की, शहरातील अधिकारी टेक उद्योगाने घेतलेल्या उसळीमुळे अंध झाले आहेत. प्रत्येकाला वाटते मध्यमवर्ग तर बाहेर जात आहे.
महानगरांत मध्यमवर्गीयांचे उत्पन्न
सॅन फ्रान्सिस्को
73000 डॉलर
न्यूयॉर्क
51000 डॉलर
लॉस एंजलिस
47000 डॉलर
वाढते घरभाडे
गेल्या तीन वर्षांत मध्यम श्रेणी प्रकारातील मासिक भाडे
3475
डॉलर
सध्या
3156
डॉलर
2012
2726
डॉलर
2011
वाढती विषमता
2006 नंतर अमेरिकेच्या 15 मोठ्या शहरांमध्ये गरीब व श्रीमंतांच्या उत्पन्नात फरक वाढला आहे. ही शहरे आहेत : सॅन फ्रान्सिस्को, शिकागो, फिलाडेल्फिया, लॉस एंजलिस, डलास, ह्यूस्टन, ऑस्टिन, इंडियाना पोलिस, सॅन अँटानियो, जॅक्सनव्हिले, सॅन डिएगो, न्यूयॉर्क, कोलंबस, फीनिक्स, सॅन जोस, सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांचे वार्षिक सरासरी उत्पन्न 2012 मध्ये दोन लाख 91 हजार डॉलर होते. सर्वात गरीब कुटुंबांचे उत्पन्न 11000 डॉलर होते. अमेरिकेत 2009 ते 2012 दरम्यान सर्वात धनाढ्य 1% लोकांचे उत्पन्न 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. इतरांचे उत्पन्न अर्ध्या टक्क्यांहून कमी प्रमाणात वाढले.