आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सततच्या अपयशानंतरही ६५ व्या वर्षी सुरू केली केएफसी कंपनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केएफसी फूड चेन सुरू करून जगात नाव कमावणारे हारलँड सँडर्स वयाच्या ६५ वर्षांपर्यंत अनेक व्यवसाय करून थकले होते. ते एकेकाळी शेतमजूरही होते. सैन्यात म्यूल टेंडरही होते. फायरमॅनही बनले. वकिली करण्याचा बेतही फसला. विमा तसेच टायर सेल्समन बनूनही नशीब अजमावले. गॅस स्टेशन चालवले. हॉटेल सुरू केले. मात्र एका नव्या महामार्गाने त्या मार्गावरील सर्व गर्दी खेचून नेली, ज्यावर त्यांचे हॉटेल सुरू होते. त्यामुळे नफा अगदीच घटला.

त्यांच्याजवळ आता उरला होता फक्त एक धनादेश व फ्राइड चिकन बनवण्याची खास कृती. जिणेे त्यांना यशस्वी केले. सँडर्स ९ सप्टेंबर १८९० रोजी इंडियानात जन्मले. बालपण कठीण परिस्थितीत गेले. सहाव्या वर्षीच पितृछत्र हरवले. आई टोमॅटो कारखान्यात काम करायची. त्यामुळे सँडर्संंना आपल्या लहान बहीण-भावांचे पालकत्व स्वीकारावे लागले. कमी वयातच सँडर्स स्वादिष्ट जेवण बनवायला शिकले.

आईने दुसरे लग्न केले. सावत्र पित्याच्या मारानंतर सँडर्स घर सोडून पळाले. काही तरी करायचे होते. १५ व्या वर्षी खोटे वय सांगून सैन्यात गेले. तेथे पूर्णवेळ काम केले. त्यानंतर स्टीमबोट पायलट, विमा प्रतिनिधी आणि शेतमजूर बनूनही नशीब अजमावले. अमेरिकन रेल्वे कंपनीत एक चांगली नोकरी मिळताच त्यांनी जोसफाइन किंगशी लग्न केले. मात्र, आदेश न पाळल्यामुळे त्यांना नोकरीवरून काढण्यात आले.

त्यामुळे पत्नीही सोडून गेली. सँडर्स यांनी ४० व्या वर्षांपर्यंत रुचकर जेवण बनवण्याचा शौक अजमावून पाहिला.गॅससाठी थांबणारे प्रवासी त्यांचे गिऱ्हाईक होते. या परिसरात दुसरे हॉटेल नव्हते. लवकरच केंटुकी फ्राइड चिकन ऑफ हारलँड सँडर्स असा लौकिक झाला. १९३५ मध्ये स्थानिक पदार्थाला नावरूप दिल्यामुळे सरकारने त्यांना केंटुकी कर्नलची पदवी बहाल केली. १९५५ ला त्यांनी हॉटेल बंद केले. सर्व लक्ष व्यावसायिक चिकन फ्रँचाइझी साखळीवर केंद्रित केले. फ्रँचाइझी देण्याचा त्यांचा प्रस्ताव अनेकदा फेटाळण्यात आला.

११ मसाले आणि आपल्या खास पद्धतीने चिकन बनवण्याचा व्यवसायाचा सँडर्स यांनी करार केला. १९६४ पर्यंत अमेरिका आणि कॅनडात केएफसीच्या ६०० हून जास्त फ्रँचाइझी तयार झाल्या. अमेरिकेतल्या सर्वाधिक जुन्या साखळी उपहारगृहांपैकी ही एक आहे. १९६९ मध्ये केंटुकी फ्रायड चिकन न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये समाविष्ट झाली. १९७१ मध्ये हबलाइन इंकने अधिग्रहण केले. व्यवसायाचा वेलू गगनावर पोहोचला.
बातम्या आणखी आहेत...