आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Fact's That How Universe Or Nature Was Created

काय आहे सृष्टी, तिची रचना कशी झाली तिच्या आरंभापासून जोडलेले काही प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सृष्टीची रचना कशाला, केव्हा व कशी झाली, हा प्रश्न नेहमीपासूनच मानवजातीला एक न उलगडलेले कोडे होऊन बसला आहे. या प्रश्नाची विशेषता अथवा त्याचे महत्त्व या गोष्टीलाही धरून आहे की, जसे विज्ञान तथा धर्म, विचार पद्धती याचे उत्तर शोधण्यासाठीदेखील उत्सुकता -तत्परता दिसते आहे. मात्र, बौद्ध दर्शनामध्ये ब्रह्मांडाची उत्पत्ती, आत्मा आणि ईश्वर आदींसंबंधीच्या समजुती व त्यासंबंधीच्या प्रश्नांना विशेष स्थान दिले गेलेले नाही. जेव्हा की सांख्य दर्शनात याला पुरुष आणि प्रकृती म्हणून दाखवले गेलेले आहे.

ख्रिश्चन धर्मात काळाच्या गतीच्या रूपात सृष्टीची परिकल्पना केली गेली आहे. ज्यानुसार सृष्टीची एक निश्चित सुरुवात, शेवट व अंत आहे. आणि ही एक सर्वव्यापी व सर्वज्ञ ईश्वराची रचना आहे. हिंदू धर्मानुसार सृष्टी अनादी काळापासून आरंभ व विलयाचा विषय राहिला आहे. अनंत काळपर्यंत हा विषय असाच राहील. वैज्ञानिकांच्या मते सृष्टीची रचना एका महाविस्फोटातून झाली आहे. ज्याला बिगबँग थेअरी म्हणतात. ज्यामुळे ब्रह्मांडाचा िवस्तार अजूनही सुरू आहे. याव्यतिरिक्त अनेक तत्त्वज्ञांनी वैयक्तिक स्तरावर या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वातील सर्व वस्तू ज्या प्रकारे आपली रचना आणि विस्ताराकरिता अन्य एखाद्या बुद्धिमान जिवावर अवलंबून असते त्याच प्रकारे पृथ्वीसुद्धा एका वस्तूसारखीच आहे. ज्याची सृष्टी आणि विकासक्रम आता एखाद्या सर्वशक्तिमान सत्तेवर अवलंबून राहिले आहे. या सत्तेला ईश्वर, असेही म्हणता येईल. दोन शतकांनंतर काहीएक बदलांसह ही युक्ती एक ख्रिश्चन विचारवंत संत अक्वाइनस यांनी सादर केली. त्यातच मत्स्य पुराणानुसार सृष्टीची रचना एका सोनेरी गर्भात ब्रह्माच्या प्रवेश करण्यामुळे झाली. या गर्भाला हिरण्यगर्भ म्हटले गेले. जेव्हाकी सांख्य दर्शनानुसार सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य पुरुष तथा प्रकृती नामक दोन शाश्वत तत्त्वांच्या आधारे उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सांख्य दर्शनानुसार पुरुष शुद्ध चेतनस्वरूप असून प्रकृती तमस, रजस व सत्त्वगुणांनी युक्त अचेतन तत्त्व आहे. सृष्टीच्या निर्मितीपूर्वी प्रकृतीचे तिन्ही गुण एका संतुलनावस्थेत शांत स्थितीत राहतात; परंतु अनादी अनंत काळात पुरुष- प्रकृतीच्या जवळिकीमुळे ही तिन्ही तत्त्वे आंदोलित स्थितीत येऊन सृष्टीची निर्मिती करायला लागतात. या दर्शनानुसार जेव्हा पुरुष अथवा शुद्ध चैतन्य प्रकृतीच्या या नृत्य अथवा क्रीडेपासून स्वत:ला तटस्थ ठेवून स्वमध्येच विलीन होतात. तेव्हा ते कैवल्य अथवा मोक्षाला प्राप्त करतात.

परंतु या सर्व परिकल्पना तसेच विचारांपासून वेगळे असे ऋग्वेदातील नारदीय सूक्त सृष्टीच्या सृजनाच्या समस्येला एका अनोख्या रूपात सादर करतात. आणि सृष्टीच्या निर्मितीच्या प्रश्नावरच प्रश्नचिन्ह लागते. नारदीय सूक्ताच्या प्रथम सूत्रानुसार सृष्टीच्या रचनेचा प्रश्न सृष्टीच्या रचनेच्या पूर्वी उपस्थित तत्त्वाच्या प्रश्नाशी अपरिहार्य रूपाने जोडला गेला आहे. परंतु सृष्टीच्या पूर्वी ना आम्ही कोणत्याही सत्य वा सत् ची वा असत्य वा असत् ची कल्पना करू शकत नाही. सृष्टीच्या निर्मितीच्या समस्येकडे आम्ही या दृष्टिकोनातून पाहिले तर सृष्टीशी जोडलेले सर्व प्रश्न आपले महत्त्व गमावून बसताना दिसतात. सृष्टीच्या निर्मितीपूर्वी कोणत्याही आरंभबिंदूची कल्पना सृष्टीच्या उत्पत्तीच्या अवधारणेला खंडित करते. अंतत: सृष्टीच्या आरंभाच्या कल्पनेचा प्रश्न स्वत:तच विरोधाभासाने ग्रासलेला आहे. तथा या मुद्द्यावर हा प्रश्न केवळ गूढ कायम ठेवतो. मात्र, या प्रश्नाशी जुळलेल्या आमच्या जिज्ञासेला शमवू शकत नाही.

याव्यतिरिक्त ब्रह्माडांची उत्पत्ती कधी झाली आहे या प्रश्नाहूनही अधिक महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे की ब्रह्माडांची उत्पत्ती का झाली? मुख्यत: या प्रश्नाचे उत्तर केवळ दोन दिशांमधूनच मिळू शकते. प्रथम ब्रह्माडांची उत्पत्ती कोणत्या कारणास्तव अथवा कोणत्या विशेष प्रयोजनासाठी झाली, दुसरे ब्रह्माडांच्या उत्पत्तीमागे कोणतेही विशेष कारण नाही. यात जर आम्ही प्रथम पर्याय निवडला तर यासाठी आम्हाला कोणत्या तरी अशा चेतनेची अथवा बुद्धीची कल्पना करावी लागेल ज्यात पृथ्वी तथा ब्रह्माडांच्या उत्पत्तीच्या प्रयोजनाच्या विचार आला असेल. परंतु या परिकल्पनेला स्वीकारताना दुसरे अनेक प्रश्न या बरोबर येतात. ज्यात ब्रह्माडांच्या निर्मितीचा विचार आला, त्याला या विचारासाठी अनादी काळ का लागला? यात ईश्वरीय चेतना ज्यात हा विचार आला आहे की, हा विचार बौद्धिक दृष्टीने आला आहे की अथवा नैसर्गिकदृष्ट्या वा सहज प्रवृत्तीतून आला आहे. दुसऱ्या बाजूने आम्ही हे मानतो की, ब्रह्माडांची निर्मिती अकारणच झाली आहे तर समजा की हा विचार अामच्या अस्तित्वाच्या भूमिकेलाच छेद देतो. एका अकारणच निर्माण झालेल्या ब्रह्मांडामध्ये आपल्या जीवनाला कोण्या नैतिक मूल्य अथवा आध्यात्मिक प्रयोजनांशी जोडण्याचा काय अर्थ होऊ शकतो.

बौद्ध दर्शनात या प्रश्नाला कोणतेही विशेष स्थान दिले गेलेले नाही हे एक आश्चर्यच आहे. जसे की सर्वविदितच आहे बुद्ध ब्रह्माडांची निर्मिती, आत्मा, ईश्वर अादी समजुतीवर आधारित प्रश्नांच्या प्रत्युत्तरात मौन धारण करतात. कारण की हे प्रश्न फक्त मानवी बुद्धीच्या कुतूहलातून जन्म घेतात. या प्रश्नाचा मानवी जीवन, त्याच्याशी जोडलेल्या दु:खांशी अथवा त्याच्या निराकरणाशी कोणताही सरळ संबंध दर्शवत नाही. बौद्ध दर्शनात अशा प्रश्नांना व्यर्थ आणि त्याज्य मानले गेले आहे.

ब्रह्माडांच्या उत्पत्तीशी जोडलेले प्रश्न किंवा त्याच्या उत्तरांच्या विभिन्न दिशांवर विचार करण्याअंती बहुधा आम्ही या निष्कर्षावर पोहोचू शकतो की, हे प्रश्न मानवी बुद्धी अथवा त्याची उपजत क्षमतेतून निर्माण होतात. या प्रश्नांचे कोणतेही उत्तर आपल्याबरोबरच अनेक प्रश्नांना घेऊन येतात. ज्याची समाधानकारक उत्तरे कोणीही देणे जवळ जवळ अशक्यप्राय वाटते आहे. या प्रश्नांचे उत्तर देण्याचे धाडस हे केवळ बौद्धिक परिकल्पनांना जन्म देऊ शकतात. जे कधीही एका निश्चित सिद्धांताचे रूप यासाठी धारण करू शकता नाहीत कारण की त्यांना सिद्ध वा असिद्ध करण्यासाठी कोणतीही निर्णायक परीक्षा आमच्याकडे नाहीच. या व्यतिरिक्त या प्रश्नांनी निर्माण केलेल्या कोणत्याही परिकल्पना अथवा त्यापासून निर्माण झालेले रीतिरिवाज मानवी जीवनाला केवळ आणि अधिक गुंतवून ठेवू शकतात. त्यांचे निराकरण करू शकत नाही. परंतु या प्रनांचे अनुत्तरित असणे वा कोडे असण्याने त्याचे महत्त्व कमी होत नाही. तर उलट वाढते. बहुधा हे प्रश्न मानवी बुद्धीला स्वत:तच गुंतवुन टाकून त्याला यथास्थान दाखवतात. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यात थकलेल्या आणि पराभूत झालेली मानवी बुद्धी जेव्हा शांतता अथवा विश्रांतीचे स्थान शोधत असते त्याच क्षणी आमची चेतना या प्रश्नांच्या तळातून स्वत:ला बाहेर आणते. अंतत या प्रश्नांचे महत्त्व मानवी बुद्धीला गूढ करण्यातच आहे. त्याचे समाधान शोधण्यात नाही.

वस्तुस्थिती - महर्षी पतंजली यांनीही योग दर्शनात ज्या प्रकारे आसन, प्राणायामाचा उल्लेख केलेला नाही, त्याचप्रमाणे ईश्वराचाही उल्लेख केलेला नाही. संपूर्ण योग दर्शनात फक्त एका ठिकाणी ईश्वर प्रणिधान असे म्हटले आहे.