तुम्ही विविध देशांच्या खाद्य पदार्थांबद्दल ऐकले असेल. कदाचित त्या पदार्थांचा स्वादही घेतला असेल, परंतु जर्मनीतील खाद्य पदार्थांबद्दल तुम्हाला क्वचितच माहिती असावे. जर्मनीत तयार होणारे व्यंजन जगभरात लोकप्रिय आहेत.
येथील खाद्य उद्योग आपल्या उत्पन्नातील एक तृतीयांश हिस्सा विदेशातून मिळवतात. खाण्याचे शौकीन लोक येथील वेगवेगळ्या डिशेसचा स्वाद घेण्याची एकही संधी कधीच सोडत नाहीत. मीट (मटन) आणि मीट प्रॉडक्ट, दुध आणि मिल्क प्रॉडक्ट, दही आणि टॉफी या पदार्थांची येथे मोठी मागणी असते. चॉकलेट पासून बेकरी प्रॉडक्टपर्यंत तसेच अल्कोहल ड्रिंक तर येथे सर्वात लोकप्रिय आहेत.
आज आम्ही तुम्हाला जर्मनीतील काही अशा डिशेसची माहिती सांगत आहोत, ज्यांची नावे चकित करणारी आहेत.
हाल्वर हान...
हाल्वर हानचा अर्थ आहे 'आधा मुर्गा' परंतु यामध्ये कोंबडीसारखे काही नाही. फक्त ब्रेडचा रोल असून यामध्ये चीज आणि लोणी भरलेले असते. जर्मनीतील राइन नदीच्या जवळपास असणार्या सर्व रेस्तरॉंमध्ये ही डिश सहज मिळते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, काहीशा अशाच चटपटीत आणि विचित्र नावं असलेल्या डिशेस संदर्भात...