आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जाणून घ्या, आत्मघातली हल्ला झालेली वाघा बॉर्डर आणि रिट्रीट सेरेमनीबद्दल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रिट्रीट सेरेमनी दरम्यान एकमेकांना सल्यूट करताना जवान)

भारत आणि पाकिस्तान या दोघांना जोडणारा एकमात्र मार्ग असलेल्या वाघा बॉर्डरवर रविवारी संध्याकाळी रिट्रीट सेरेमनी या कार्यक्रमानंतर दहशतवाद्यांकडून आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात पाकिस्तानचे सुमारे 55 जण ठार झाले असून यामध्ये तीन रेंजर्सचाही समावेश आहे. तर या हल्ल्यात जवळपास 200 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. वाघा बॉर्डरवर दररोज होणार्‍या रिट्रीट सेरेमनी पाहाण्यासाठी हे लोक आले असताना कार्यक्रम संपल्यानंतर हा आत्मघातली स्फोट घडवण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. या स्फोटानंतर येथील तीन दिवसांसाठी रिट्रीट सेरेमनीचा हा कार्यक्रम बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

काय आहे वाघा बॉर्डर
वाघा बॉर्डर ही एक सैन्याची चौकी आहे. ही चौकी भारतात पंजाबच्या अमृतसर आणि पाकिस्तानच्या लाहोर या दोन शहरादरम्यान आहे. वाघा बॉर्डर ही भारत-पाकिस्तानच्या सीमारेषेवरील एकमात्र रोड असलेली चौकी आहे. वाघा बॉर्डरच्या प्रवेशव्दाराला सुवर्ण जयंती गेट म्हणतात तसेच याच्या आसपासचा परिसर खुपच सुंदर आहे.

रिट्रीट सेरेमनी म्हणजे काय
देशातील एका प्रसिध्द वृत्तपत्राने 62 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या लेखानुसार, भारतीय सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यामध्ये एक करार झाला होता. यामध्ये दररोज संध्याकाळी अमृतसरजवळील वाघा बॉर्डरवर होणार्‍या परेड "बीटिंग द रिट्रीट" मध्ये दोन्ही देशांतर्फे एकमेकांना सद्भावनापूर्वक प्रदर्शन करण्यात येईल. त्यामुळे रोज संध्याकाळी सीमारेषेजवळ हा फक्त ६.०० ते ६.३० असा अर्ध्या तासाचा ध्वज संचालनाचा कार्यक्रम होतो. मात्र हा कार्यक्रम पाहाण्यासाठी पर्यटक मात्र दोन वाजेपासूनच या ठिकाणी गर्दी करायला लागतात.

काय होते यावेळी
# अमृतसरच्या वाघा बॉर्डरवर दररोज संध्याकाळी भारतीय सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाकिस्तान रेंजर्सच्या सैन्य तुकड्या एकत्र येतात.
# रोज संध्याकाळी 6 ते 6.30 वाजता येथे ध्वज संचलनाचा कार्यक्रम होतो. यावेळी दोन्ही देशाचे जवान एकमेकांना सल्यूट मारतात. हा अलौकीक सोहळा पाहण्यासाठी दोन्ही देशातील पर्यटक गर्दी करतात.
# विशेष दिवशी म्हणजेच 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस आहे आणि 15 भारताच्या स्वातंत्र्य दिनाची सुरूवात होते त्यामुळे त्या 14 ऑगस्टच्या संध्याकाळी वाघा बॉर्डवर शांतीसाठी रात्रभर जागरण केले जाते.
# या रात्री बॉर्डवर दोन्ही देशांच्या लोकांना एकमेकांशी भेटण्याची परवानगी देण्यात येते.

कसे पोहोचाल वाघा बॉर्डरपर्यंत
वाघा बॉर्डरला जाण्यासाठी अमृतसर हे सर्वात जवळचे ठिकाण आहे. अमृतसरच्या रेल्वेस्टेशन पासून हे ठिकाण अवघ्या 28 किमीच्या अंतरावर आहे.
या ठिकाणी हवाईमार्ग, रेल्वेमार्ग आणि भूमार्ग या तीन्ही प्रकारे पोहोचता येते.
१) हवाईमार्गाने पोहोचण्यासाठी जवळचे विमानतळ - राजा सांसी विमानतळ आणि श्री गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
२) जवळचे रेल्वे स्टेशन - अमृतसर रेल्वे स्टेशन
३) बसस्थानक - अमृतसर बसस्थानक
४) तसेच अमृतसरवरून टॅक्सी, रिक्षा, खासगी वाहनेसुध्दा उपलब्ध आहेत.

वाघा बॉर्डवरील या अलौकीक सोहळ्याचे PHOTO पाहा, पुढील स्लाईडवर आणि शेवटच्या स्लाईडवर पाहा रिट्रीट सेरेमनीचा VIDEO