आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिता-पुत्र: न्यायसंस्थेतील पिता-पुत्राच्या आयुष्यातील समान क्षण जाणा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : फली नरिमन आणि मुलगा रोहिंटन
मुलगा आणि वडिलांत बरेच साम्य असते. मात्र, त्यांच्या आयुष्यातील काही घटना एकसमान असतील तर ती बाब वेगळी ठरते. देशातील प्रख्यात विधिज्ञ फली नरिमन यांची अशीच इच्छा पूर्ण झाली. मुलगा रोहिंटन सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती आहेत. या दोघांबाबत जाणून घ्या...

फली नरिमन -सुप्रीम कोर्टात वकील
- जन्म : १०-०१-१९२९
- शिक्षण : बिशप कॉटन स्कूल, सिमल्यात शाळा, मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमधून अर्थशास्त्र व इतिहासात बीए, मुंबई लॉ कॉलेजमधून पदवी.
- कुटुंब : पत्नी बाप्सी, मुलगा रोहिंटन, मुलगी अनाहिता डॉक्टर आहे.
रोहिंटन नरिमन-सुप्रीम कोर्टात जज
- जन्म : १९५६
- शिक्षण : मुंबईच्या कॅथेड्रल अँड जॉन कॉननमध्ये शाळा, श्रीराम कॉलेजमधून पदवी, दिल्ली विद्यापीठातून कायदा व हार्वर्डमधून एलएलएम.
- कुटुंब : पत्नी सनाया शैक्षणिक सल्लागार. दोन मुले.
चर्चेत : सर्वोच्च न्यायालयात नुकतीच एका खटल्याची सुनावणी झाली. त्या वेळी रोहिंटन नरिमन न्यायमूर्ती, तर पिता फली नरिमन वकील होते.

चर्चेला तोंड फुटले
मुलगा आणि वडिलांनी एकाच न्यायालयात काम करावे काय, अशी चर्चा कायद्याच्या जगतात सुरू झाली होती. अधिवक्ता कायदा १९६१ मध्ये बार कौन्सिलला यासंदर्भात नियम बनवण्यास सांगितले होते. यानंतर अशा प्रकारचे प्रकरण समोर आले नाही. त्यानंतर फली नरिमन सर्वोच्च न्यायालयात जाणार नसल्याचे वृत्त आले. मात्र, त्यांनी याचा इन्कार केला.

वयाच्या केवळ २२ व्या वर्षी वकिली व्यवसाय सुरू करणा-या फली यांच्या घरी १९५६ मध्ये रोहिंटन यांचा जन्म झाला. फली विख्यात वकील जमशेदजी कांगा यांच्यासोबत राहत होते. ते त्यांना फादर फिगर मानत. जमशेदजींनी पाद्री समुदायात विधिवत पुजारी म्हणून दीक्षा घेतली होती. याचा अर्थ वेळप्रसंगी असे पुजारी लग्नही लावू शकतात. फली यांना आपल्या बॉसपासून एवढी प्रेरणा मिळाली की त्यांनी मुलाला लहान वयातच तयार केले. घरात धार्मिक वातावरण असावे, अशी फली यांच्या पत्नीची इच्छा होती. रोहिंटन १२ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी पारसी पुजा-याची दीक्षा पूर्ण केली होती. रोहिंटन यांना पारसी मंदिरात याच शिक्षणासाठी ठेवले होते. बालक रोहिंटन पारसी धार्मिक ग्रंथ जेंदावेस्ताचे दिवसाकाठी पाच वेळा अध्ययन करत आणि त्यातील ७२ अध्याय लक्षात ठेवत होते. यादरम्यान रोहिंटन यांनी तीन तासांत जेंदावेस्ता ऐकवले व पारसी पुजारी झाले.

वडिलांप्रमाणेच कमी वयात (२३) रोहिंटन यांनी १९७९ मध्ये मुंबईत वकिली सुरू केली. ३७ व्या वर्षी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम सुरू केले. या पदासाठी ४५ वर्षांची अट आवश्यक होती. हा एक योगायोगच असावा की, १९६६ मध्ये फली ३८ वर्षांचे असताना त्यांना उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्या वेळी न्यायमूर्तींचे वेतन घरखर्च भागेल एवढे चांगले नव्हते. फली यांच्या पत्नीने ही बाब दहा वर्षांच्या अनाहिताला सांगितली तेव्हा ती म्हणाली, पप्पांना न्यायमूर्ती होण्यास सांग, मी चॉकलेट खाणे सोडून देते. आता मुलगा न्यायमूर्ती झाला आहे. आणखी एक घटना दोघांमध्ये समान आहे. १९७२ मध्ये फलींना देशाचे अतिरिक्त महाधिवक्ता करण्यात आले होते. ते तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पाठीमागील बंगल्यात राहत होते. आणीबाणीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी पद सोडले. रोहिंटन यांनाही याच वयात महाधिवक्ता करण्यात आले होते. मात्र, कायदामंत्र्यांशी न जमल्यामुळे त्यांनी पद सोडले होते.