आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Knowledge About Brain Hemorrhage By Dr. Shakir Hussain

मेंदूत रक्तस्राव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही कारणांमुळे मेंदूत रक्तस्राव होण्याच्या घटनांत वाढ होते आहे. तथापि, यामागे एखादी दुर्घटना होणे हे एकमेव कारण नाही, तर वाढता तणावही कारणीभूत आहे. समाधानाची गोष्ट इतकीच की, यापूर्वीच्या तुलनेत आता यावर उपचार सोपा झाला आहे. यातून बरे होण्यास फार काळ लागत नाही. नव्या उपचार पद्धतीमुळे १५ दिवसांत रुग्ण पूर्ववत होतो.

सीनियर कन्सल्टंट, इंटर्व्हेशनल न्यूरोलॉजी, संचालक, स्ट्रोक अँड न्यूरोसेव्हॅस्क्युलर क्लिनिक, चेअरमन स्ट्रोक अँड न्यूरोइंटर्व्हेशन फाउंडेशनमेंदूत रक्तस्राव किंवा त्याच्या आसपास रक्तस्राव होत असेल तर त्याला ब्रेन हॅमरेज म्हटले जाते. तो अचानक होऊ शकतो. रक्तवाहिनी फुगल्याने किंवा फाटल्यानेही होतो. हा स्ट्रोकच्या स्वरूपातही असतो. याला हॅमरेजिक स्ट्रोक असे म्हणतात. याशिवाय डोक्याला मार लागल्यानेही होऊ शकतो.
ब्रेन हॅमरेजचे प्रकार आणि कारणे - चार प्रकारचे हॅमरेज असतात.
१. सबड्यूरल हॅमरेज
२. एक्स्ट्राड्यूरल
३. सुबराकनॉइड आणि
४. इंट्रासेरेब्रल

कोणत्याही दुर्घटनेनंतर सबड्यूरल आणि एक्स्ट्राड्यूरल हॅमरेज होतात. खूप वेळ हॅमरेज झाल्यास मेंदूवर परिणाम होऊ शकतो. सुबराकनॉइड आणि इंट्रासेरेब्रल हॅमरेज अचानक होऊ शकतात. जर रक्तवाहिनीमध्ये थोडीशी इजा झाल्यास तो बेशुद्ध होऊ शकतो.
ब्रेन हॅमरेजचा प्रभाव
ब्रेन हॅमरेजचा प्रभाव खूप वेळ राहण्याची अनेक कारणे असू शकतात. मेंदूला कोठे जखम झाली आहे? यावरही ते अवलंबून असते; पण जखमेनंतर प्रत्येक व्यक्तीची रिकव्हरी वेगवेगळी असते. जर इंट्राक्रॅनियल वाहिनीत कोठे जखम झाल्यास जिवाला धोका होऊ शकतो. अशा स्थितीत त्या व्यक्तीचा जीव वाचणे अवघड असते. जर इंट्राक्रॅनियल वाहिनीमध्ये जखम नसल्यास उपचार करणे सोपे जाते. ब्रेन अॅन्यरिस्म एक प्रकारचा धोकादायक आजार आहे. पण यासाठी नवी उपचार पद्धती आली आहे.
ब्रेन अॅन्यरिस्म
हा रक्तवाहिन्या कमकुवत असल्यामुळे होतो. यात वाहिन्याच्या बाहेरील पटलावर छोटे बबल्स येतात. कारण वाहिन्यात रक्तप्रवाह वेगाने होत असतो. त्यामुळे वाहिनीमध्ये बबल किंवा फुगलेला भाग फाटतो आणि ब्रेन हॅमरेज होते. अनेकदा अशा प्रकारचा कमकुवतपणा अानुवंशिक असतो. अनेकांना आपल्या मेंदूत अॅन्यरिस्म आहे याची कल्पना नसते. रुग्णाला जेव्हा डोकेदुखी किंवा इतर त्रास जाणवत असल्यास स्कॅनमुळे माहिती होतो.
गंभीर अडचण
डोकेदुखी होणे अॅन्यरिस्म असत नाही. परंतु मायग्रेनसारखे दुखत असणे आणि बरे न होणारे दुखणे म्हणजे अॅन्यरिस्म असते. जर रुग्णाने म्हटले माझे डोके फुटण्याची वेळ आली आहे, यापूर्वी कधी इतके भयंकर दुखणे नव्हते. त्याचबरोबर त्याच्या पाठीत आणि मानेतही दुखत असेल तर अशी शक्यता असते. अॅन्यरिस्ममुळे दुखत असलयास एक प्रकारची सुस्ती किंवा चक्कर येणे, पडण्याची तक्रार येऊ शकते. अनेकदा फिट्स किंवा लकवाही होतो.
अशा वेळी सीटी स्कॅन केल्यानंतरच खरी माहिती मिळू शकते. ब्रेन अॅन्यरिस्मचे १० मधील ३ रुग्ण दवाखान्यात वेळेवर पाेहोचू शकत नाहीत. एक तर त्यांना लकवा होतो किंवा बेशुद्ध होतात किंवा कोमातही जातात. त्यांना अतीव दक्षता कक्षात नेले जाते. ज्यांना थोडी डोकेदुखी वाटत असेल तर ते लवकर बरे होतात. ब्रेन अॅन्यरिस्मचे २४ तासांत निदान करून घ्यावे. कारण पुन्हा रक्तस्राव होऊ शकतो. तो धोकादायक ठरू शकतो. यासाठी लवकर निदान करून घ्यावे.
जर अॅन्यरिस्ममुळे डोके दुखत असेल तर...
मेंदूत रक्तस्राव का होतो आहे, याची माहिती करून घ्यावी. यासाठी ब्रेन अँजिओग्राफी केली जाते. याला व्हॅसल सेरेब्रल डीएसएही म्हटले जाते. यासाठी जांघेत एक कॅथेटर मेंदूपर्यंत नेले जाते. यात डाय इंजेक्ट केले जाते. त्यामुळे एक्स-रे मशीनवर सर्व गोष्टी स्पष्ट होतात. या मशीनला न्यूरोव्हॅस्क्युलर कॅथ लॅब असे म्हटले जाते. आधुनिक न्यूरोव्हॅस्क्युलर कॅथ लॅबमध्ये अॅन्यरिस्म कोणत्या वाहिनीतून सुरू झाला हाेता याचीसुद्धा माहिती होऊ शकते. अशा प्रकारच्या चाचणीत तज्ज्ञ न्यूरोइंटरव्हेनिस्ट असतात.
अॅन्यरिस्म बरा कसा कराल?
अशा प्रकारचा त्रास बरा करण्याचे दोन प्रकार आहेत. मेंदू उघडून सर्जरी केली जाते. यात जी वाहिनी फुगली किंवा फाटली आहे ती बंद करावी. त्यात मेटल क्लिप लावण्यात येते.
नवी उपचार पद्धती
नव्या उपचार पद्धतीत जास्त कापावे लागत नाही. नव्या तंत्राला एंडोव्हॅस्क्युलर कॉइलिंग ऑफ अॅन्यरिस्म असे म्हटले जाते. यात न्यूरोव्हॅस्क्युलर कॅथ लॅबचे अाधुनिक स्वरूप असते. यात इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट एक कॅथेटर किंवा लहानशी नळी मेंदूत टाकतात. हा जांघेतून तेथेपर्यंत पाेहोचवला जातो. यानंतर एक सूक्ष्म कॅथेटर वाहिनी जिथे फुगली आहे तेथे पाेहोचवतात. थ्रीडी रोटेशनल अँजिओग्राफी नंतर काय करावे याचा निर्णय घेतला जातो. यात डिटॅचेबल प्लॅटिनम कॉइलने अॅन्यरिस्म बरे केले जाते. या कॉइलनेच पॅकिंग केली जाते. यामुळे कोणत्याही प्रकारचा रक्तस्राव होण्याची शक्यता राहू नये.
यानंतरही काही घडेल?
एकदा क्लिप लावल्यानंतर किंवा कॉइलपासून रक्तस्राव सील केल्यानंतर रुग्ण पूर्ववत होतो. त्यानंतर रक्तस्रावाचे कोणतेही उदाहरण नाही. जर क्लिप योग्य पद्धतीने बसली नसेल तर किंवा कॉइल लागली नसेल तर काही केसमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. यासाठी फॉलोअप घ्यावा लागतो. यासाठी मेंदूची अँजिओग्राफी करावी लागते. क्लिप व्यवस्थित काम करते आहे किंवा नाही हे एक-दोन वर्षांत कळते. जर दोन वर्षे परिणाम एकसारखे आल्यास हॅमरेज झाला होता हे विसरून जा.
एंडोव्हॅस्क्युलर कॉइलिंग
शरीरात जास्त काप द्यावे लागत नसल्याने ही खूप चांगली पद्धत म्हटली जाते. यामुळे रुग्णाला जास्त भीती बाळगण्याची गरज नाही. या दिवसांत पाइपलाइन फ्लो डायव्हर्जन डिव्हाइसच्या मदतीने उपचार होतो. याला क्रांतिकारी तंत्र मानले जाते. ब्रेन अॅन्यरिस्मने पीडित जुन्या रुग्णावरही उपचार करता येतो. यात स्टेंटसारख्या उपकरणाने मुख्य शीर बरी केली जातो. यामुळे
रक्त सुरळीत वाहू लागते.
वस्तुस्थिती - एंडोव्हॅस्क्युलर कॉइलिंगमध्ये मेंदू उघडण्याची गरज नाही. केवळ एक मिमीचा छेद केल्यानंतर काम भागते. जुन्या पद्धतीच्या सर्जरीमध्ये जो रुग्ण ६ ते ३ महिन्यांत बरा होतो, यात १० दिवसांत बरा होतो.