आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबूज :केकचा पहिला घास दादांना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष, केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचा भला मोठा केक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कापला जाईल म्हणून सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या. मात्र, अजितदादा मागेच उभे राहिले. मधुकरराव पिचड आणि छगन भुजबळ या जोडीने केक कापला.. केकचा पहिला घास दादांना देण्यासाठी पिचडांनी लगेच दादा कुठे आहे म्हणून शोधले.. तर दादा मागेच उभे होते. मग पिचडांनी या केकचा पहिला घास भरवला तो अजित पवारांना..आणि नंतर व्यासपीठावरील सर्वच नेतेमंडळींनी एक-एक करून केक ग्रहण केला..हे सर्व दृश्य दुरून बघणा-या कार्यकर्त्यांनीही कार्यक्रम संपल्यावर केकवर येथेच्छ ताव मारला..