आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुजबुज: पक्षात मतभेद असतातच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्वच्छ प्रतिमेचे मानले जातात. त्यामुळे औरंगाबाद-जालना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रत्येक उमेदवार ठरवण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी स्वच्छ प्रतिमेचा आग्रह धरला. बाजार नको, असेही बजावले. पैसेवाल्यालाच उमेदवारी द्यायची असेल तर पक्षाचा उपयोग काय, असा सवाल करून नेत्यांना गार केले. प्रत्यक्षात मातब्बर सुभाष झांबड यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या पदाधिका-याने नेत्याकडे हे असे कसे झाले, अशी विचारणा केली. त्यावर मुरलेला नेता म्हणाला, ‘अरे बाबा, पक्षात मतभेद असतातच. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा मुद्दा मांडला; पण ग्राउंड रिअ‍ॅलिटी आम्हालाच माहिती आहे. शेवटी निवडून येणारा उमेदवार झांबड असल्यामुळे त्यांना तिकीट दिले आहे.