आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुजबुज : फक्त ‘नामा’त अंतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक भपकेबाज लग्न - Divya Marathi
एक भपकेबाज लग्न


नामांतर लढ्यानंतर श्रेय घेण्यासाठी सारेच पुढे आले. मात्र, एक नामांतर झाले तर त्याचे श्रेय आठवलेंनाच जाणार हे नक्की. मनसेने शिवसेनेत विलीन व्हावे, असा परखड सल्ला महायुतीतील नेते रामदास आठवले यांनी दिला. पाठोपाठ लगेचच राज ठाकरे यांना कार्याध्यक्षपद मिळवून देण्याविषयी उद्धव यांना सुचवू, असे जाहीर केले. आठवले यांना कुणी फारसे सिरियसली घेत नाही, परंतु त्यांची मागणी मात्र जोर धरू लागली आहे. तसेही फक्त नाव वेगळे सोडले तर मनसे व शिवसेनेत फारसा फरक नाहीच. म्हणजे फक्त नामातच अंतर आहे. आता हेच अंतर कमी व्हावे यासाठी अवघा मराठी माणूस कार्यरत असताना आठवलेही कार्यरत झालेत. (तेही मराठीच आहेत की ) मात्र राज आलेच तर त्यांना कुठले पद देण्याविषयी विचार केला जाईल, हे विधान जरा अतिशयोक्तीचेच वाटले. मात्र, म्हणतात ना राजकारणात काहीही घडू शकते. तसे भविष्यात घडल्यास व आठवले म्हणतात त्याप्रमाणे कार्याध्यक्षपदी राज ठाकारे यांना बसवल्यास बाळासाहेबांनंतर रामदास आठवले यांचा तर आदेश चालत नाही ना, अशी शंका मात्र येण्यास जागा राहील व या नामांतराचे श्रेय कदाचित पूर्णपणे रामदासजींना देण्यास कुणाचीच हरकत नसावी.