आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुजबुज: दिले तर घेऊन टाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले होते. त्यांनी एक लांबलचक भाषण ठोकले. सोबत विद्यापीठातील विकासकामांसाठी दहा कोटी रुपये देण्याची घोषणाही केली. कार्यक्रम संपल्यावर झालेल्या प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते मंडळींच्या चर्चेत हा मुद्दा निघाला. फक्त दहा कोटीच मिळाल्याबद्दल नाराजीचा सूरही व्यक्त झाला. तेव्हा महापालिकेच्या कारभाराशी संबंधित असलेला कार्यकर्ता म्हणाला, ‘जेवढे दिले तेवढे घेऊन टाका.आमच्या महापालिकेचे पदाधिकारी एक-एक, दोन-दोन कोटींसाठी तरसत आहेत. त्यांच्यापेक्षा तर तुमची अवस्था खूपच चांगली आहे.’