आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली भेट...तू तिथे मी..एका वादळाशी झाले लग्न..ऊर्मिलांमुळेच सप्तर्षी कायम \'कुमार\'!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिकित्सक वृत्ती, कुशल संघटक, प्रभावी वक्ता... विद्यार्थी नेता ते आमदार... महात्मा गांधी ते जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचे पाईक.. युक्रांदचे संस्थापक आणि सध्या महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष... आज वयाची सत्तरी ओलांडली असली तरी कुमारांनाही लाजवणारी ऊर्जी आणि ऋषींसारखी साधना आणि ज्ञान.. यामुळे कुमार सप्तर्षी हे नाव ते सार्थक करतात. मात्र या या संपूर्ण वादळी प्रवासात पत्नी ऊर्मिला यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन त्यांना बळ दिले. कार्याचे समाधान मिळू दिले. त्यामुळेच सप्तर्षी आजही कुमार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील खेड येथे 1949 मध्ये जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांच्या कुटुंबाने प्रगतीच्या सर्व गोष्टी सर्वप्रथम पाहिल्या. चष्मा, सायकलसारख्या वस्तू सप्तर्षी कुटुंबानेच गावात आणल्या. आज या गोष्टींचे अप्रूप वाटणार नाही. पण तो काळ व ग्रामीण भाग पाहाता या गोष्टी व त्याचे किस्से विलक्षणच. कुमार यांचे वडील गणेश सप्तर्षी यांचा चष्मा नदीत पडला आणि वाहून गेला. तो सहा महिन्यांनी कुणीतरी परत आणून दिला. सप्तर्षींशिवाय कुण्या दुसर्‍याची ही वस्तू असूच शकत नाही, हा विचार करून चष्मा त्यांच्यापर्यंत परतला. एकूणच काय तर 20 गावांमध्ये एकमेव डॉक्टर म्हणजे गणेश सप्तर्षी. त्यामुळेच कुमार सप्तर्षी  लहानपण सुखवस्तू, त्यानंतर नगर व पुढे पुण्यात त्यांचे शिक्षण झाले..

पुढील स्लाइडवर वाचा, पहिली भेट- ऊर्मिला यांची..तू तिथे मी..तू मला नि मी तुला मेलो...

हेही वाचा..

> शब्द पेरून कवितांचे पीक घेणारा ‘शेतकवी’; अप्रकाशित राहिली ना.धों.महानोरांच्या घरातली ही 'कविता'
 
बातम्या आणखी आहेत...