आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंजक: एल. सुब्रह्मण्यम यांनी संगीताच्या प्रेमापायी सोडला वैद्यकीय पेशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"सलाम बॉम्बे' आणि "मिसिसिपी मसाला'सारख्या चित्रपटांना संगीत देणारे सुब्रह्मण्यम पाच वर्षांपर्यंत वडिलांसोबत जाफनात राहत होते. त्यांनी वडिलांकडूनच संगीताचे शिक्षण घेतले. व्हायोलिनवर नवीन धून तयार करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यांनी संगीत आणि एमबीबीएसचे शिक्षण एकाच वेळी सुरू ठेवल्याचे खूप थोड्या लोकांना माहीत असावे. त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केल्यानंतर प्रॅक्टिसही सुरू केली होती. मात्र, त्यानंतर संगीताच्या ओढ्यामुळे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्््समधून त्यांनी वेस्टर्न क्लासिकलमध्ये पीजी घेतली. त्यांनी जगातील प्रसिद्ध संगीतकार येहुदी मेनुहिन आणि जीन पियरेसोबत काम केले. १९९९ मध्ये त्यांचा अल्बम "ग्लोबल फ्यूजन' विशेष प्रसिद्धी पावला. २०११ मध्ये संयुक्त राष्ट्राकडून त्यांना निमंत्रित केले होते. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुब्रह्मण्यम यांचा पहिला विवाह विजीसोबत झाला होता. फेब्रुवारी १९९५ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांच्याशी त्यंानी विवाह केला. पहिल्या पत्नीपासून त्यांना चार मुले झाली. यामध्ये बिंदू गीतकार आहेत, अम्बी वडिलांप्रमाणेच व्हायाेलिन वाजवतो, तर नारायण गायक आहे.
- जन्म : २३ जुलै १९४७
- वडील : व्ही. लक्ष्मीनारायण, आई- सीतालक्ष्मी (दोघेही संगीतज्ञ)
- शिक्षण : एमबीबीएस, संगीतात पीजी
- कुटुंब : पत्नी कविता कृष्णमूर्ती, ४ मुले
- चर्चेत : २४ वर्षांनंतर ते पुन्हा चित्रपटास संगीत देणार आहेत.