आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाद: मजुराच्या मुलाने केला ७००० कोटींचा घोटाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटकमध्ये नुकताच लॉटरी घोटाळा समोर आला. यामध्ये परी राजनला अटक करण्यात आली. पहिल्यांदा तो ज्याच्यासाठी लॉटरीचे काम करत होता, तो यामध्ये सहभागी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोघांमध्ये अनेक साम्ये आहेत. हे दोघे काेण आहेत व त्यांच्याकडून कोण पैसे घेत होते ते जाणून घेऊया...
मजुराच्या मुलाने केला ७००० कोटींचा घोटाळा

परी राजन | लॉटरी व्यावसायिक
* वय- ५२ वर्षे
चर्चेत- अवैध लॉटरी व्यवसायाची कबुली

राजन नटराजन ऊर्फ परी राजनच्या अटकेमुळे संपूर्ण कर्नाटकात खळबळ उडाली आहे. एका मजुराच्या मुलाची पाेलिसाशी असणारी मैत्री अाणि ७००० कोटी रुपयांच्या लॉटरी घोटाळ्याचे हे प्रकरण आहे. एका मोठ्या तपासकार्यानंतर परीला अटक करण्यात आली. त्याच्या मागे लॉटरी किंग सेंटिगो मार्टिनचा हात असल्याचे सांगण्यात येते. दोघांची काम करण्याची पद्धत आणि जीवनशैली एकसमान असल्यामुळे मार्टिनवर संशय आहे.

राजनचे वडील तामिळनाडूतून कर्नाटकमध्ये मोलमजुरीसाठी आले होते. त्यांनी कोलारच्या साेन्याच्या खाणीत मजूर म्हणून काम केले. राजनचे लहानपणही तिथेच गेले. कोलारमध्ये बांगरपेठच्या आसपासचे बहुतांश मजूर राजनला आपल्यापैकीच एक मानत होते. एका कन्नड वृत्तवाहिनीने दोन महिन्यांपूर्वी स्टिंग ऑपरेशन केले तेव्हा ७ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यामागील प्रमुख व्यक्ती राजन असल्याचे उघड झाले. पोलिस दलातील अनेक मोठे अधिकारी राजनचे मित्र असल्याचे सांगितले जाते. यामध्ये बंगळुरूचे अतिरिक्त आयुक्त आलोककुमार यांचा समावेश आहे. २२ वर्षांपूर्वी तरुणपणी राजन मार्टिन एंटरप्रायजेस कंपनीमध्ये जनसंपर्क विभागाचे काम पाहत होते. पैसा आल्यानंतर ते मजुरांची वसाहत सोडून बांगरपेठच्या उच्चभ्रू भारतनगरमध्ये राहण्यास गेले. २२ एकर जमिनीचा मालक २२ वर्षांत पोलिस अधिका-यांशी संबंध वाढवत होता. अधिका-यांना तो कोट्यवधींच्या भेटवस्तू देत होता. सीआयडी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तो चित्रपट उद्योगातील अनेक निर्माते, फायनान्सर आणि कलाकारांनाही मदत करत होता. त्यांना पैसे देत होता. नव्या लोकांना काम देण्याच्या नावाखाली कमिशन घेत होता. तो आठवड्यातून दोन दिवस शेषाद्री किंवा वृंदावन एक्स्प्रेसमधून नियमित येत होता. लो प्रोफाइल राहणीमान, पटकथालेखक असल्यामुळे नियमित यावे लागते, असे तो लाेकांना सांगत असे.
पुढे वाचा, एक मजूर झाला लॉटरी व्यवसायाचा बादशहा