Home »Divya Marathi Special» Languanges Can Teach In Womb

गर्भातच भाषा शिकते बाळ

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 07, 2013, 04:43 AM IST

  • गर्भातच भाषा शिकते बाळ

आश्‍चर्य

गर्भातच भाषा शिकते बाळ

महाभारतात अभिमन्यूने आईच्या गर्भात असतानाच चक्रव्यूह भेदण्याचे रहस्य ऐकले होते आणि ते शिकूनही घेतले होते, ही कथा तुम्ही ऐकली असेलच. म्हणजेच बाळ गर्भात असतानाच मातेकडून बोलली जाणारी भाषा शिकू लागते, या गोष्टीला शास्त्रज्ञांनीही दुजोरा दिला आहे. पॅसिफिक लूथरन युनिव्हर्सिटीत सायकोलॉजीचे प्राध्यापक क्रिस्टिन मून यांनी हे संशोधन केले. त्यानुसार प्रसूतिपूर्वीच्या 10 आठवड्यांत बाळ भाषेवर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे जन्मानंतर लगेच ते स्वत:ची भाषा आणि इतरांची भाषा यातील फरक ओळखायला शिकते.

Next Article

Recommended