आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Style, 2014 Fashion, Happy News Year 2014

NEW YEAR पार्टीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी करा अशी स्टाइल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या वर्षाच्या पार्टीत यंदा स्पार्कल आणि शाइन यावर भर असेल. सिक्वेन्स, मेटॅलिक आणि मिनी ब्लॅक ड्रेस बांध्यानुसार घातल्यास खुलून दिसेल. आपल्या शरीराला चांगली दिसेल अशी स्टाइल करा. स्मार्ट दिसण्यासाठी नवे प्रयोग करा. काहीही घातले तरी तीन गोष्टी लक्षात ठेवा : फिट, फॅब्रिक आणि स्टाइल महत्त्वाची. डिझायनर पवन सचदेवांनी पार्टी लूकच्या टिप्स दिल्या आहेत.


कलर/ फॅब्रिक/ डिझाइन
पुरुष : रंगावर प्रयोग करून पाहा. उदा. बरगंडी, ग्रीनमधील बॉटल ग्रीनसारखे शेड्स, रस्ट, मस्टर्ड, ऑरेंज, पर्पल खुलून दिसेल. शर्ट, टी-शर्ट, ब्लेझर, जीन्स, टाय किंवा पॉकेट स्क्वेअरसाठी हे रंग चांगले दिसतील. ब्लॅक अँड व्हाइट कॉम्बिनेशनसह मोनोक्रोमेटिक इफेक्ट द्या.

महिला : इतर महिलांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी मिनी ब्लॅक ड्रेस किंवा ब्राइट रेड ड्रेसवर समाधान मानू नका. न्यू इयर पार्टीसाठी आऊटफिट स्टायलिश, ट्रेंडी आणि कलरफुल असला पाहिजे. फॅब्रिकमध्ये लेदर, वेलवेट, सिल्कचाही वापर केला तरी चालेल.


अस्मिता अग्रवाल
20 वर्षांपासून फॅशन क्षेत्रातील लेखनासाठी प्रसिद्ध, नवी दिल्ली
asmita.aggarwal@dainikbhaskargroup.com