आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेट-1 : पुढील प्रश्नांची उत्तरे द्या
० भारतातील पाच श्रीमंत व्यक्तींची नावे
० पाच वर्षांत मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक जिंकणा-यांची नावे सांगा.
० पाच वर्षांत मिस युनिव्हर्स काँटेस्ट विजेत्यांची नावे सांगा.
० नोबेल पुरस्कार विजेत्या पाच जणांची नावे सांगा.
० जगात सर्वाधिक पैसे कमावणा-या पाच खेळाडूंची नावे सांगा.
पाच प्रश्नांचा दुसरा सेट बनवा आणि त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.
सेट-2 : पाच प्रश्नांची उत्तरे द्या
० तुमची मदत केलेल्या पाच जणांची नावे.
० तुम्हाला काही चांगले शिकवलेल्या पाच जणांची नावे सांगा.
० जे तुम्हाला विशेष वाटतात, असे पाच जण सांगा.
० ज्यांच्यासोबत वेळ घालवणे तुम्हाला चांगले वाटते, अशा पाच जणांची नावे सांगा.
० वेळोवेळी तुमच्या सल्ल्याची गरज पडते, असे पाच जण कोणते?
तुम्ही दुस-या सेटमधील प्रश्नांची उत्तरे अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकाल. पहिल्या सेटमधील प्रश्नांची उत्तरे दिल्यास तुमचे सामान्यज्ञान कळेल. त्यामुळे तुम्ही एखादी प्रश्नमंजूषा जिंकू शकाल, पण सेट-2 ची उत्तरे दिल्याने तुमचे आयुष्य सुखी आणि अर्थपूर्ण बनेल. तुम्ही हे प्रश्न इतरांना विचारले तर सेट-1 च्या उत्तरांमध्ये तुमचे नाव येईल, ही शक्यता फार कमी आहे. पण सेट-2 च्या उत्तरांमध्ये तुमचे नाव येण्याची शक्यता जास्त आहे.
जे लोक पहिल्या सेटची उत्तरे देण्यात यशस्वी होतात, ते समाजासाठी महत्त्वाचे असतात, पण जे लोक दुसºया सेटची उत्तरे देतील ते तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करण्यात यशस्वी होतील. अशा लोकांची संगत करण्याचा प्रयत्न करा. आता पेन किंवा पेन्सिल घेऊन सेट-2 च्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक प्रश्नापुढे पाच नावे लिहा. या सेटमध्ये जसजशी माणसांची नावे लिहीत जाल, तसा तुमच्या आयुष्यातील आनंद वाढत जाईल.
लेखक अमेरिका आणि जपानमध्ये प्रेरक वक्ते म्हणून कार्यरत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.