आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी भाषा शिका, नवे मित्र जोडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परदेशी कंपनी किंवा अन्य देशांच्या लोकांबरोबर काम करत असताना कधीही भाषेचा अडसर ठरणार नाही, याची काळजी घ्या. त्यांची संस्कृती समजून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करा आणि त्यांना आपल्याही संस्कृतीबद्दल माहिती द्या. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने त्यासंबंधी दिलेली माहिती...


टिप्स
छोट्या मुद्द्याने मेमोची सुरुवात करा
आजकाल ई-मेलमुळे प्रत्येक काम झटपट होऊ लागले आहे. तरीही एखाद्या कामातील लोकांची गती वाढवण्यासाठी आजसुद्धा लांबलचक मेमो आणि अहवालांची आवश्यकता भासतेच. प्रदीर्घ लेखन मुद्देसूद असावे आणि त्यात वाचकांचे भान राखले जावे. याचाच अर्थ तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे, हे तुम्ही आधीच स्पष्ट करायला हवे. शीर्षक छोटे ठेवा आणि विषयपंक्तीमध्येच संपूर्ण मुद्दा स्पष्ट करा. तुमच्या लेखनाची सुरुवात छोट्या मुद्द्याने करा. खाली विस्ताराने लिहीत असताना त्या मुद्द्याचा उल्लेख करा. लिहिणे आटोपल्यानंतर संपूर्ण मेमो कसा तयार झाला आहे, याची पुन्हा एकदा फेरपडताळणी करा.
(स्रोत : ‘एचबीआर गाइड टू बेटर बिझनेस रायटिंग)


टॉकिंग पॉइंट्स
टीव्ही मालिकेमुळे लोकांच्या विचारात बदल
20 व्या शतकात अमेरिकेमध्ये टीव्हीवर जे दाखवले जात होते, त्यात ‘मेनस्ट्रीम’ मालिकेचाही समावेश होता. या मालिकेमुळे लोकांचा राजकीय दृष्टिकोन बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे हार्वर्ड विद्यापीठाच्या फिलीप केम्पंट आणि डॅनियल ए. हॉजमन यांना आढळून आले आहे. 1946 ते 1960 दरम्यान अमेरिकी काँग्रेसच्या निवडणुकीत टीव्हीने महत्त्वाची भूमिका बजावत राजकीय पक्षांचे ध्रुवीकरण थोपवले होते.
(स्रोत : जर्नल ऑफ पब्लिक इकॉनॉमिक्स)


परदेशातील नियम आत्मसात करा
तुम्ही परदेशातील नियमानुसार काम करत असाल तर काही चुका घडण्याची श्क्यता आहे. चुका टाळण्यासाठी सोबतच्या लोकांना विश्वासात घ्या. तुम्ही त्यांची संस्कृती व रिवाज शिकू इच्छिता, असे त्यांना वाटले पाहिजे. तुम्हाला भलेही नियमांची माहिती नसेल; पण तुमची जिज्ञासा, अभिरुची दाखवण्यासाठी जीव ओतून काम करा. त्यासाठी तुम्ही विश्वासार्हताही प्राप्त करा.
(स्रोत : प्रिपेअरिंग फॉर इनअ‍ॅव्हिटेबल कल्चर, फॉक्स पास)


प्रगतीमध्ये भाषा अडसर ठरू नये
व्यामिश्र संस्कृतीत रुळलेल्या व्यवस्थापकांना सध्या मागणी आहे. त्यासाठी अनेक भाषा येण्याची गरज नाही. अन्य प्रदेशातील मित्रांना प्रश्न विचारत रहा. जगाचा इतिहास, आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी विषयांची माहिती ठेवा. त्यामुळे विचारांच्या कक्षा रुंदावतात. आंतरराष्ट्रीय साहित्य वाचा. परदेशी चित्रपट पाहा. लोकांमधील चांगले ते ओळखा. ते कोणती भाषा बोलतात, त्याकडे फारसे लक्ष देऊ नका. (स्रोत : ‘जॉइन द ग्लोबल एलिट्स’ ग्रेगरी सी, उनरूह व अँजल केबरेरा)


प्रोत्साहन भत्त्यामुळे शिक्षकांत गोंधळ
3 हजार डॉलर : न्यूयॉर्कमधील विद्यार्थ्यांच्या वाटचालीत सुधारणांसाठी शिक्षकांसाठी प्रोत्साहन योजना राबवण्यात आली. मात्र, या योजनेचा सकारात्मक परिणाम झाला नाही. हार्वर्ड विद्यापीठाचे रोनॉल्ड जी. फ्रायर यांनी 200 पब्लिक स्कूल्सचे अध्ययन केले. केनिया व भारतात प्रोत्साहनाचे चांगले परिणाम आढळले, परंतु आपल्या प्रयत्नांचे कोणत्या पद्धतीने पुरस्कारात रूपांतर झाले हे न्यूयॉर्कमधील शिक्षकांच्या लक्षात आले नाही. प्रतिशिक्षक 3000 डॉलर (सुमारे 1 लाख 80 हजार रुपये) प्रोत्साहन होते. अमेरिकेच्या सरकारने 27 राज्यातील शाळा शिक्षकांसाठी प्रोत्साहन निधीसाठी 1.2 अब्ज डॉलर तरतूद केली आहे.
(स्रोत : जर्नल ऑफ लेबर इकॉनॉमिक्स)


अनेक पदे सांभाळा, चांगले सीईओ व्हा!
10 लाख डॉलर : तुम्ही जर विपणन आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित असाल तर तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी बनू शकता. तरीही तुम्ही सर्वसाधारणपणे माध्यमातील सीईओ (कंपनीमध्ये अनेक पदांवर काम करून पुढे आलेले लोक) कमावतात तेवढे कमवू शकत नाही. कारण मॅनेजर बनण्याचे त्यांचे कौशल्य असते. अशा प्रकारच्या सीईओंच्या पगाराचा वार्षिक प्रीमियम 19 टक्क्यांपर्यंत असतो. अ‍ॅरिझोना स्टेट विद्यापीठाच्या क्लाउडिया कस्टोडिया यांच्या नेतृत्वातील चमूने हे अध्ययन केले आहे. या प्रीमियमचा अर्थ आहे, प्रत्येक वर्षी पगाराव्यतिरिक्त 10 लाख डॉलर (सुमारे 6 कोटी रुपये) वेगळी प्रतिपूर्ती मिळेल.
(स्रोत : जर्नल ऑफ फायनान्शियल)