Home »Divya Marathi Special» Leck City Udaipur,Mewadi Colour In Cate Mostva

उदयपूरमध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवात मेवाडी रंग

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 10, 2013, 12:10 PM IST

  • उदयपूरमध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवात मेवाडी रंग

उदयपूर - लेकसिटी उदयपूरमध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याची परंपरा नसली तरी गुजरातमधील आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात मेवाडी संस्कृतीचा ठसा उमटवण्यासाठी उदयपूरचे पतंगबाज सज्ज आहेत.

यंदाच्या पतंग महोत्सवादरम्यान
प्रथमच गुजरातच्या आसमंतात राजस्थानी इतिहास, संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणारे पतंग भिरभिरणार आहेत. तसेच पतंगांवर मेवाडी संस्कृती चितारण्याची ही पहिलीच घटना आहे.

उदयपूरमधील अब्दुल मलिक स्मृती इंटरनॅशनल काइट क्लबचे पतंगबाज सोहेल अहमद आणि दानिश अहमद हे दोघे कच्छमधील धोरडो येथे होणा-या 25 व्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात सहभागी होणार आहेत. गुजरात पर्यटन विभागातर्फे त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ते दोन दिवस कच्छमध्ये, तर दोन दिवस अहमदाबादमधील महोत्सवात पतंग उडवणार आहेत. तसेच यादरम्यान ते गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लबच्या सदस्यांनी बनवलेले एक चित्रही भेट म्हणून देणार आहेत.

कोण- कोणते पतंग?
सोहेल आणि दानिश यांनी बनलेल्या पतंगावर महाराणा प्रताप यांचे अश्वारूढ चित्र आहे. तसेच दुस-या पतंगावर मेवाड संस्कृतीचे प्रतीक महाराणा प्रताप आणि त्यांचे सैनिक आहेत. तसेच काही पतंगांवर राजस्थानी लग्नातील शाही वराती चितारण्यात आल्या आहेत. या पतंगांचा आकार 5 बाय 5 फूट आहे. तसेच व्हाइट टायगर, 30 फूट लांबीचे ऑक्टोपस, किंगफिशर, 200 पतंगांची ट्रेन इत्यादी प्रकारचे पतंगही उडवले जाणार आहेत. नखाच्या आकाराचा पतंग
उदयपूरमधून अब्दुल कादीर हे पतंगबाजही गुजरातच्या महोत्सवात जाणार आहेत. गेल्या वर्षी मोदींच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळाला होता. यावर्षी ते बेटी बचाओचा संदेश देणारे 200 पतंग, तर नखाच्या आकाराचा एक छोटा पतंगही उडवणार आहेत.

मलिक मामांचे नाव अजरामर करणार
सोहेल आणि दानिश अहमद हे उदयपूरमधील प्रसिद्ध पतंगबाज अब्दुल मलिक यांचे भाचे आहेत. लहानपणापासूनच त्यांना पतंगबाजीची आवड आहे. डिसेंबर 2011 मध्ये अब्दुल मलिक यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या भाच्यांनी पतंगबाजीच्या माध्यमातून त्यांची कला जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षीच्या गुजरात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात त्यांच्या पतंगबाजीची वेगळी छाप पतंग शौकिनांचे लक्ष वेधून घेत असते.

Next Article

Recommended