आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकवण: शत्रू बलशाली असावा; अन्यथा दुहेरी पराजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बऱ्याच वेळा लोक मित्रांसोबत खूप वेळ व शक्ती खर्ची घालतात. मात्र, सर्व सुरळीत आहे तोपर्यंतच ही मैत्री टिकते. जेव्हा संकट येते तेव्हाच वास्तविकता लक्षात येते. आपली मैत्री शत्रुत्वाइतकी दृढ नसते. शत्रुत्व आपल्या नसानसात मुरते, आपल्याला तीव्र वेदना देण्यास ते जास्त प्रभावी असते. जगात कोणाशी शत्रुत्व पत्करायचे असेल तर शत्रू लहान नसावा. जितका मोठा शत्रू निवडाल तितकाच भव्य विजय पदरात पडेल. छोट्या-मोठ्या शत्रूंशी लढण्यात काय हशील?

इसापाची कथा आहे. एका गाढवाने सिंहाला आव्हान दिले. त्याने थेट द्वंद्वयुद्धासाठी सिंहाला पुकारले. मात्र, सिंह चुपचाप निघून गेला. हे सर्व कोल्हा ऐकत होता. त्याने तत्काळ सिंहाला याचे कारण विचारले. तुम्ही गाढवाचे आव्हान का नाकारले? तेव्हा सिंह म्हणाला, गाढवासोबत मी मैदानात उतरणेच माझ्या प्रतिष्ठेला मारक आहे. माझ्या कुळात असे कधी घडले नाही. आम्ही गाढवाचा खात्मा करू शकतो, हे सर्वज्ञात आहे. मग लढायचे कशाला? गाढव हरले तरी त्याचा अपमान होणार नाही.

मी जिंकलो तर माझाही सन्मान होणार नाही. लोक म्हणतील, गाढवाशी जिंकल्याचे काय मोठे कौतुक? जर चुकूनमाकून गाढवच जिंकले तर गाढवच ते, त्याचा काय भरवसा? माझी तर प्रतिष्ठा कायमची जाईल. त्यामुळे मी शांतपणे काढता पाय घेतला, असे सिंहाने सांगितले. लहानांशी खेळी खेळाल तर दुहेरी हार होईल. जिंकलात तरीही छोट्याकडूनच आणि हरलात तर मानहानी निश्चित.

शत्रुत्व विचारपूर्वक करा. ताकदवान शत्रूला पराजित करण्यासाठी तुम्हाला क्षमता वापराव्या लागतील. अडथळे, संघर्ष यातून तुमचा आत्मविकास शक्य आहे. बाह्य वस्तूंशी लढतात ते वस्तूंकडून पराजित होतात. साम्राज्य कितीही मोठे असो, पण मालकी वस्तूंवर स्थापित होते. त्यामुळे जे स्वत:वर विजय मिळवतात त्यांना आपण सन्मान देतो. राजांपेक्षा जास्त मोठे स्थान ऋषींचे राहिले आहे.
बातम्या आणखी आहेत...