आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करातील पतीच्या मृत्यूनंतर ती धाडसाने झाली लष्करी अधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न होऊन जेमतेम २१ महिने झाले होते तोच चिप्पी यांच्या संसाराला दृष्ट लागली. भावी आयुष्याचे स्वप्न रंगवण्याआधीच पती सोडून गेले. कोचीहून पतीची सामग्री घेण्यास गेल्या तेव्हा तेथील लोकांनी हवाई दलात भरती होण्याचा सल्ला दिला. त्यांनी तोपर्यंत तसा विचारही केला नव्हता. महाविद्यालयीन जीवनात कंपनी सेक्रेटरी होण्याचा त्यांचा मानस होता. बँकेत संधी मिळाली तेव्हा त्यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दैवात वेगळेच लिहिले होते. चिप्पी म्हणाल्या, आमच्या कुटुंबातील कोणताच सदस्य लष्करात नव्हता. नौदलातील नियुक्तीदिवशी एवढी भावुक झाले की संपूर्ण रात्र रडत होते. त्या दिवशी सासू-सासरे आणि आई-वडील तिथे उपस्थित होते, मात्र कुणीच काही बोलले नाही. लग्नाआधी जोसला भेटत होते तेव्हा ते नौदलातील रँकिंग स्ट्रक्चर समजावून सांगत होते.

पती जहाजावर राहत होते, त्यामुळे लग्नानंतर नौदल तळावर बरेच दिवस सोबत राहण्यास मिळाले. आज स्वत: एक नौदल अधिकारी झाले याचा अभिमानही आहे. एका नौदल अधिकाऱ्याची पत्नी, नौदल हे एक कुटुंब म्हणून सुरुवातीस सीनियर किंवा ज्युनियर ऑफिसर या पदावर लक्ष दिले जात नाही. सर्व जण त्यांना मॅम म्हणत होते, आता मात्र त्या एक जबाबदार नौदल अधिकारी आहेत.

वय : ३० वर्षे
पती : शहीद ले. कमांडर जोस मॅथ्यू
शिक्षण : बीकॉम आणि एलएलबी
कुटुंब : सासू-सासरे आणि आई-वडील
२०१३ मध्ये मॉरिशसमधील अपघातात पतीचे निधन.