आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिलीच नियुक्ती युद्धाच्या सर्वात उंच मैदानावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लष्करात अधिकारी बनणाऱ्या प्रिया पहिल्या वीरपत्नी आहेत. कुणी मला बिचारी म्हटलेले आवडत नाही, असे त्या म्हणाल्या. पतीच्या निधनानंतर सर्व जण त्यांच्याकडे सर्व सहानुभूतीने पाहू लागले, त्यामुळे त्या कोणाला भेटतही नव्हत्या. लोकांपासून लांब जाण्यासाठी त्यांनी स्वत:चे घर सोडून किरायाच्या घरात राहणे पसंत केले. दुर्घटनेला आठ दिवसच झाले नव्हते तेव्हा पतीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अरुण अग्रवाल म्हणाले, तुम्ही अधिकारी म्हणून लष्करात दाखल झाले पाहिजे. सुरुवातीस निर्णय घेऊ शकत नव्हते. भावाने समजावल्यानंतर तयारी झाली. प्रिया लहानपणी टॉमबॉय होती. तिची पोलिस दलात जाण्याची इच्छा होती. १९ व्या वर्षी लग्न झाल्यामुळे शिक्षण आणि नोकरीचे स्वप्न अपूर्ण राहिले. लग्नावेळी पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होत्या. लग्नानंतर पदव्युत्तर पदवी आणि बीएड केल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वसाधारणपणे जवानाची पत्नी एवढी शिकलेली नसते. मात्र, पतीचा यासाठी संपूर्ण पाठिंबा मिळाला. शिक्षिका झाल्यानंतर ट्युशन सुरू केल्या. मात्र, पतीच्या निधनानंतर आयुष्याला कलाटणी मिळाली. पतीची दुर्घटना झाली तेव्हा आई खूप दु:खी झाली होती. मात्र, नौदलात नियुक्ती झाली तेव्हा सर्वात जास्त त्यांनाच आनंद झाल्याचे त्या म्हणाल्या. पतीचे नाव इतिहासात कोरले गेले याचा अभिमान वाटत असल्याची त्यंाची भावना आहे. पतीचा लवकर विसर होऊ नये यासाठी त्या धडपडत होत्या. सैन्यात जाण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. अकादमीमध्ये जात होत्या तेव्हा त्या वीरपत्नी आहेत, याची कोणालाच कल्पना नव्हती. प्रशिक्षणानंतर त्यांनी १२ पदकांची कमाई केली. सर्वात उंच युद्ध क्षेत्र लेहमध्ये त्यांना पहिल्यांदा नियुक्त करण्यात आले.

वय : २८ वर्षे
पती : शहीद नायक अमित शर्मा
शिक्षण : बीएड आणि मॅथ्समध्ये पदव्युत्तर पदवी
कुटुंब : सहा वर्षांची मुलगी ख्वाहिश
२०१२ मध्ये अरुणाचल प्रदेशातील कारवाईत पती शहीद झाले.