आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीवन एक उत्सवच, कामाचा भार नव्हे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. त्यांचे जीवनदर्शन प्रस्तुत केले जाते. मात्र, आयुष्यात श्रीकृष्णाचे विचार अंगिकारले जात नाहीत. आपल्या देशाने पर्यायाने सरकार श्रीकृष्णाच्या विचारावर चालले असते तर आतासारखी स्थिती राहिली नसती. कृष्ण विचार काय आहेत? आयुष्य एक उत्सव आहे, काम नाही, कर्तव्याचा भार नाही, असा हा संदेश आहे. त्यांचे आयुष्य एक रासलीला आहे, नैतिक बंधन नाही. कृष्णाने लहानपणापासून अखेरपर्यंतचे आयुष्य नाचगाणे व खोड्या केल्या. जगात कोणत्या देवतेच्या ओठावर बासरी आहे? आपला ईश्वर बासरी वाजवत स्त्रियांसोबत नाच करत असेल, अशी कल्पना भक्तगण करू शकत नाहीत. मात्र, कृष्णाने गमतीने या सर्व गोष्टी केल्या. त्याउलट त्याने बासरीला प्रतिष्ठा दिली, रासलीलेला गौरवाचे स्थान दिले.

कृष्णाने आयुष्यातील धीर-गंभीरपणा नाकारत मोकळेपणाने आयुष्य जगायला शिकविले. प्रेम जीवनाचा रस आहे, त्याचा भरपूर स्वाद घ्या, हे त्यांनी आपल्या वागण्यातून दाखवून दिले. विशेष म्हणजे, 16 हजार स्त्रियांसोबत लग्न करूनही कृष्णाच्या ईश्वरत्वामध्ये उणेपणा आला नाही. याचे कारण म्हणजे ते अंतरंगात योगी होते. पाप-पुण्याच्या मानकांपेक्षा त्यांचे स्थान वरचे होते. कर्माचा कुठलाही मुलामा नसलेल्या अवस्थेमध्ये ते होते. त्यामुळे मोकळेपणाने जीवन जगा, निर्सगाने ज्या काही वृत्ती-प्रवृत्ती दिल्या आहेत, त्याचा स्वीकार करा, आनंद घ्या मात्र आतमध्ये गुरफटत जाऊ नका. आज कृष्णाचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. आधुनिक माणूस ऐश्वर्य, विलासी जीवनाकडे आकृष्ट होत आहे. याचे कारण म्हणजे लोकांकडे पैसा झाला आहे. हवेत स्वातंत्र्याचा मोकळेपणा आहे. नृत्य आणि संगीत जीवनशैलीचा भाग बनले आहे. अशा स्थितीत श्रीकृष्ण संदेश अधिक लाभदायक वाटतो. निर्सगातील फूल, पक्षी तसेच आकाशातील ढगाप्रमाणे श्रीकृष्णाचे जीवन म्हणजे एक उत्सव वाटतो. माणूस वगळता सा-या जीवनाकडे उत्सव म्हणून पाहते. कृष्णाची पूजा करू नका, त्याच्यासारखे जगायला शिका. हा कृष्णाचा पुनर्जन्म आहे. जगात कृष्णवृत्तीचा विस्तार झाल्यास अनेक वाईट गोष्टी बंद होतील. जग अधिक शांत व आनंदी होईल.