आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीवनात संकटे आल्याशिवाय मोठे विचार मनात येत !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात संकटे आल्याशिवाय मोठे विचार मनात येत !
ठिकाण - स्टॅनफर्ड विद्यापीठ
दिनांक - 16 जून 2013
वॉल स्ट्रीटच्या एका कंपनीत लिपिकाच्या नोकरीने माझ्या करिअरची सुरुवात झाली. हे काम मी खूप मन लावून करायचो. कंपनीतून काढण्यात आल्याच्या दिवसापर्यंत मी त्याच उत्साहाने काम केले. कंपनीने कामावरून काढले हे माझ्यासाठी फायद्याचे ठरले. त्या कंपनीत मी नव्या तंत्रज्ञानाविषयी सल्ला दिला; परंतु काही जमले नाही.

तंत्रज्ञानात जेव्हा अडथळा येतो तेव्हा काही तरी नवीन निíमती होत असते. कंपन्या, सरकार, संघटना आणि शाळांना त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये अडथळा चालत नाही. यासाठीच नवे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते. तंत्रज्ञानातील अडथळे कमी होऊ लागतात तसे विकास करणे, प्रगती करणे सुलभ होते. पण स्वत:च्या तत्त्वांवर अडून राहिल्यास बाजारात टिकून राहणे कठीण बनू लागते. तुमच्या चांगल्या, गतिशील आणि स्वस्त संशोधनामुळे अमेरिका खूप पुढे जाईल. मला कंपनीतून काढण्यात आले तेव्हा मी तेच केले जे आता कित्येक लोक सिलिकॉन व्हॅली आणि न्यूयॉर्कमध्ये करत आहेत. मी स्वत:ची तंत्रज्ञान कंपनी उघडली. 1981 मध्ये संगणकाचा उदय झाला होता. तेव्हा मला लोक वेडा म्हणायचे. माझे एक स्वप्न होते, त्यावर मला आत्मविश्वास होता आणि धैर्याने ते मी पूर्ण केले. संधी मिळाल्यास जोखीम पत्करावी. आयुष्यात संकटे आली नाहीत, शंका उत्पन्न झाल्या नाहीत आणि निराशा आली नाही तर मोठे विचारसुद्धा मनात येत नाहीत.