आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Listen To Bengali Version Of Indian National Anthem

\'जन गण मन\'चे सुमधुर बंगाली व्हर्जन ऐकले आहे का, हा VIDEO नक्की बघा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोबल विजेते रविंद्रनाथ टाघोर यांनी 'जन गण मन' राष्ट्रगीताची रचना केली. त्याच्या पहिल्या पाच कडव्यांना संगीतबद्धही केले. संस्कृत शब्द असलेल्या बंगाली भाषेत हे गीत लिहिले आहे. या राष्ट्रगीताचे बंगली व्हर्जन अगदी नवीन स्वरुपात मांडण्यात आले आहे. त्याला बंगाली संगीतकार कबीर सुमन, रुपम इस्लाम, बाबूल सुप्रियो आणि कौशिकी चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गीत बंगालीत असले तरी मन मोहुन घेते.
भारतीय प्रोडक्शन हाऊस एसव्हीएफने 'भारतो भाग्यो बिधाता' नावाचा हा व्हिडिओ अपलोड केला आहे. यात भारत-पाकिस्तान फाळणी, इंग्रजांचे जुलमी राज्य, उसळलेल्या दंगली, स्वातंत्र्य समर, त्यातुन उभा राहिलेला भारत आदी घटना मांडण्यात आल्या आहेत.
ब्रिटनचे किंग जॉर्ज आणि क्विन मॅरी यांचा गौरव करण्यासाठी टाघोर यांनी हे गीत लिहिले होते, असा दुष्प्रकार प्रारंभी करण्यात आला होता. त्यावर टाघोर यांनी किंग जॉर्ज यांना पत्र लिहिले होते. या गाण्यातील भारत या शब्दाचा अर्थ देव असा आहे, असे त्यात सांगितले होते. त्याची प्रत अजूनही जपून ठेवण्यात आली आहे.
24 जानेवारी 1950 रोजी या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला.