आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिंपिकमधून प्रचंड उत्पन्नाचे संकेत- 55 अब्ज रुपये तिकीट विक्रीची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रीमियम सुविधा- 25420 रुपयांचे तिकीट घेणा-यांना 60.50 कोटी रुपये किमतीच्या पॅव्हेलियनमधील सुविधांचा लाभ घेता येईल. शॅम्पेनसह फोर कोर्स डिनरचा आस्वाद घेता येईलच, शिवाय येथे बारही आहे.
खास तिकीट- तिकिटांची विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना वयाएवढे पाउंड देऊन तिकीट घेता येईल. 60 वर्षांपेक्षा अधिक व्यक्तींसाठी 1375 रुपयांचे तिकीट आहे. काही क्रीडा संकुलात तर नवजात बालकाचेही पूर्ण तिकीट द्यावे लागणार आहे. याचा कडाडून विरोध होत आहे.
- 25575 रुपये खर्चातून ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन
- 70 लाख तिकिटांची आतापर्यंत विक्री
हे आहेत निकष- तिकिटाच्या रकमेत फेरफार व काळाबाजार थांबवण्यासाठी तिकिटावर होलोग्राम, बारकोड व बुक करणा-याचे नाव आहे. बनावट तिकीटप्रकरणी 17 लाख 24167 रुपये दंडाची तरतूद आहे. तरीही भानगडी सुरूच आहेत. युक्रेनचे प्रतिनिधी काळाबाजार करताना पकडले गेलेत.
काळाबाजार थांबणार नाही- सर्बियाच्या अधिकृत तिकीट विक्रेत्याने मध्यपूर्वेच्या एका ग्राहकाला 69 लाखांत 1300 तिकिटे विकली. एका चिनी विक्रेत्याने उच्च श्रेणीचे एक तिकीट 5 लाख 17352 रुपयांत देण्यास तयारी दर्शवली. सायप्रस, इस्रायलच्या विक्रेत्यांनी 525 तिकिटे 56 लाख 95047 रुपयांत विकली.