आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साहाने मनसोक्त जगा एकाकी जीवन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकटे राहणे ही एखादी शिक्षा आहे की मौज? तसे पाहिले तर एकट्या महिलेने त्याचा आनंदच उपभोगायला हवा. एका प्रसन्न सकाळी मी माझ्या एका मैत्रिणीसोबत बाल्कनीत बसले होते. नाश्त्यानंतर आम्ही ध्यानधारणेवर चर्चा करत होतो. ती एकटीच राहते. मी तिला तिच्या एकटे राहण्यामुळे जाणवणार्‍या एकाकीपणाबाबत विचारले, तेव्हा ‘मी माझे जीवन मनसोक्त जगत आहे. एकाकीपणाचा विचार करण्यासाठी माझ्याजवळ वेळच नाही’, असे तिने सांगितले.

एकटे राहणारे अनेक लोक आहेत. पारंपरिक पद्धतीने एकाकीपणा हा ओझे समजणार्‍या महिलांचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. 30 ते 40 वर्षांच्या अनेक महिला एकट्या राहतात आणि आनंदाने जगत आहेत. काही जणींना म्हातारपणाची चिंता असते, ही वस्तुस्थिती आहे, परंतु जेव्हा तुमची मुले शिकण्यासाठी कुठेतरी अन्य ठिकाणी गेलेली आहेत आणि तुम्ही एकट्याच पडल्या तेव्हाही अशीच परिस्थिती उद्भवते. विवाहितांमध्येही आपल्या दोघांपैकी कोणी तरी एकजण अगोदर जाणार आणि कोणाला तरी एकटे राहावे लागणार, हे माहीत असतेच.

ज्या महिला एकट्या राहतात त्यांनी जीवनात कोणत्या रणनीतीचा अंगीकार करावा? आपल्या एकटेपणाचा स्वीकार आणि मान्य करा : एकटे राहण्यासाठी कारणे शोधू नका. तुम्हाला परिस्थितीचा जोरकसपणे स्वीकार करावाच लागेल. त्यामुळे तुमच्या सभोवतालचे लोकही तुमचा त्याच पद्धतीने स्वीकार करू लागतील. आतापर्यंत तुम्ही योग्य व्यक्तीची प्रतीक्षा करत बसला आहात, असे समजण्याचे कारण नाही. एकटे राहण्याचा निर्णय तुमचाच होता, ही खूणगाठ मनाशी बांधा.

नेटवर्क वाढवा : मित्र मग ते कोणत्याही वयाचे किंवा कोणत्याही क्षेत्रातील असोत ते तुमच्या मदतीला धावून येऊ शकतात. शेजारपाजार ओळखीचा असेल, अशाच ठिकाणी राहा. सुरक्षित घर घ्या आणि आजूबाजूच्या चार-पाच लोकांशी मैत्री करून घ्या, म्हणजे अडचणीच्या वेळी ते तुमच्या पाठीशी उभे राहू शकतील.

प्रत्येक महिन्यात मित्रांसोबत कॉफी-केक किंवा सहलीला जाण्याचे नियोजन करत राहा. त्यामुळे तुम्हाला जीवनात भविष्याकडे बघण्याची संधी मिळेल. आपली आर्थिक सुरक्षितता लक्षात ठेवा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. जेव्हा तुम्ही निघून जाल, तेव्हा तुम्ही लोकांच्या स्मरणात कशा राहाल? तुम्ही एकट्याच आहात तर कला, संगीत, पुस्तक, लेख किंवा ब्लॉग अथवा तुम्ही केलेल्या दानाच्या माध्यमातून लोकांच्या स्मरणात राहू शकता. आपल्या आजूबाजूच्या जगाला त्यास हे सांगणे आवश्यक आहे की, एकटे राहणे हा तुमचा प्रांजळ आणि स्वखुशीने घेतलेला निर्णय आहे, तेव्हाच ते मान्य करू लागतील.

-प्रिव्हेंशन नियतकालिकामधून
डॉ. प्रभा चंद्रा,
एमआयएमएचएएनएस, बेंगळुरू