आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी मॅरेज: वैवाहिक जीवनाचा दीर्घायुष्याशी असतो थेट संबंध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवाहित जीवनाचा दीर्घायुष्याशी संबंध आहे. आयोवा स्टेट विद्यापीठात मानव विकास आणि परिवार अभ्यासणारे प्राध्यापक प्रोफेसर पीटर मार्टिन यांच्या म्हणण्यानुसार, विवाह हा सामाजिक संकेत आहे. मार्टिन आणि त्यांच्या सहका-यांच्या अभ्यासानुसार, वृद्धापकाळात जेव्हा आजार बळावतात तेव्हा जोडीदार अकाली मृत्यू टाळण्यात मदत करत असतो. त्याचबरोबर यशस्वी वैवाहिक आयुष्य व्यतीत करणा-यांच्या तुलनेत अविवाहितांची कमी वयात मृत्यूची शक्यता जास्त असते. २०१३ला १५३३० हृदयरोग रुग्णांवर करण्यात आलेल्या प्रयोगानुसार विवाहितांच्या आरोग्यात अविवाहितांपेक्षा चांगली सुधारणा झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर दुस-या एका प्रयोगानुसार विवाहितांमध्ये कर्करोगाचे निदान लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचा लवकर मृत्य होण्याची शक्यता कमी होते. विवाहितांची व्यायाम करण्याची व धूम्रपान सोडण्याची शक्यताही जास्त असते. मात्र, विवाहाचा प्रभाव पुरुष आणि स्त्रियांमध्ये सारखा नाही. टर्मन लाइफ सायकलच्या अभ्यासानुसार, घटस्फोटित किंवा पुनर्विवाह करणा-यांच्या तुलनेत निरंतर वैवाहिक आयुष्य जगणा-या पुरुषांचे आयुर्मान जास्त असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे घटस्फोटित स्त्रियांचे आयुर्मान विवाहित पुरुषांच्या आयुर्मानासमान आहे. १९२१ मध्ये सुरू झालेल्या टर्मन प्रोजेक्टमध्ये १५०० व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. कॅलिफॉर्निया विद्यापीठातील मनोवैज्ञानिक प्रोफेसर हॉवर्ड फ्रीडमॅन यांच्या म्हणण्यानुसार, सुखी आणि वैवाहिक आयुष्य जगणा-या महिला स्वस्थ असतात. त्याचबरोबर अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा महिलांचेही आयुर्मान चांगले राहिल्याचे निष्कर्ष आहेत. मात्र, त्यांचे अनेक चांगले मित्र होते. संशोधकांच्या माहितीनुसार सुखी वैवाहिक जीवनाचे अनेक फायदे आहेत. संशोधक डेननिस किकोल्ट ग्लासेर व रोनाल्ड ग्लासेर यांनी ओहियो स्टेट विद्यापीठात पती-पत्नी या विषयावर अनेक प्रयोग केले आहेत. एका प्रयोगात काही जोडप्यांच्या शरीरात रक्त एकत्र करणारे कॅथेटर लावण्यात आले. त्यांना सहजीवनातील कटू अनुभव आणि कठीण प्रसंगांसंबंधी बोलायला सांगण्यात आले. जी दांपत्य एकमेकांप्रति आक्रमक होती, त्यांच्या रक्तात स्ट्रेस हारमोन अधिक प्रमाणात आढळून आले. त्यांची अटकाव करण्याची क्षमता दुबळी होती. चरबीयुक्त अन्न खाल्ल्यानंतर त्यांच्या चयापचयाचा स्तर कमी होता. लोकांच्या वागणुकीचा त्यांच्या आरोग्यावर सरळ परिणाम होतो, असे किकोल्ट ग्लासेर यांचे म्हणणे आहे.