आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच ड्रेसमधून बदला लूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड अभिनेत्रींना डिझायनर आऊटफिटमध्ये नवीन लूक देणा-या डिझायनर रॉकी एस यांनी आपल्या आवडत्या पाच पेहरावांविषयी सांगितले. हे पेहराव भारतीय सौंदर्याला चार चाँद लावतात, असे त्यांचे म्हणणे आहे. हा पेहराव उन्हाळ्याची तीव्रता स्टाइलमध्ये राहून कमी करू शकतो. डिझायनरने आपल्या आवडीविषयीदेखील सांगितले.


ड्रेप्ड गाऊन
हा पेहराव केला तर एका सेकंदामध्ये परिधान करणा-याला सामान्य लूकमधून अल्ट्रा फॅशनेबल लूक येतो, परंतु हा ड्रेस परिधान करण्यापूर्वी फिगर लक्षात घेतली पाहिजे. या ड्रेसमुळे बाहूंचे सौंदर्य दाखवण्याची संधी मिळते. कंबरेखालील भाग स्थूल असतील तर सैल कपडे परिधान करा. विशेष करून लोअर आउटफीटला सैल ठेवा. रॉकी एसला साडीशी संबंधित ड्रेप्ड गाऊन खूप आवडतात. त्यात इंडियन आणि वेस्टर्नला मिक्स पाहण्याची संधी मिळते.


फ्लोई ट्युनिक
हा ड्रेस स्किनफीट जीन्स, हेरम पँटसोबत परिधान केल्यानंतर चांगला लूक देतो. परफेक्ट लूकसाठी कंबरेवर बेल्ट देता येऊ शकतो. आपल्या आवडीनुसार त्यावर एम्पायर वेस्ट किंवा ड्रॉप्ड वेस्ट परिधान करता येऊ शकते. ट्रेंडमध्ये राहिल्याने ए-लाइन किंवा अ‍ॅस्मिट्रिकल लूक निवडला पाहिजे.


क्रीस्प व्हाइट शर्ट-डेनिम
हा ड्रेस मुलींकडे असलाच पाहिजे. तो अगदीच डिसेंट लूक देणारा ठरतो. उष्णतेमध्ये व्हाइट, राइट कलर सिद्ध होऊ शकतो. त्यातून चांगला फीलदेखील मिळतो. शेपमध्ये राहण्यासाठी फिटेड शर्ट चांगली दिसते. टँजरिन किंवा बेबी पिंक कलर परिधान करण्यातही वेगळी मजा आहे. नेक किंवा स्कूप नेकलाइन आरामदायी ठरते. नेकलाइनला प्लेन ठेवले तर बोरिंग वाटू शकते. त्यात ग्राफिक प्रिंट किंवा रफल्स चांगला दिसतो.


इंडियन साडी
हा ड्रेस क्लासिक असून कोणत्याही स्त्रीला परिधान केल्यानंतर तो तिच्या सौंदर्यात वाढ करतो. काही दिवसांपूर्वी ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी तरल इंग्लिश रंगातील ऑर्नेट ड्रेसवर दिसल्या होत्या. विशेष प्रसंग ी हा ड्रेस सुंदर दिसतो. रॉकी एसच्या मते, साडी ही अशी परंपरा आहे जी ट्रेंडमधून कधीही बाहेर पडलेली नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रसिद्ध गायिका पुसीकँट डॉल्सच्या लूकमध्ये नवेपण आणले होते. त्यासाठी जरीची बॉर्डर असलेली साडी डिझाइन केली होती.


शीफ्ट ड्रेस
हा विशेष ड्रेस खांद्यापासून खाली सैल राहतो. या ड्रेसमध्ये डिफाइन्ड वेस्ट नसल्यामुळे फिगर आणखी खुलते. ड्रेस घाईगडबडीत तयार केला तरी अतिशय आरामदायक असतो. त्यात फॅशनेबल लूक मिळतो.

लेखिका 20 वर्षांपासून फॅशन क्षेत्रात कार्यरत.