आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचा ब्रेकअप झालाय... असे सावरा तुमच्या आयुष्याला, पुन्हा ताकदीने उभे राहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात एखाद्या मुलीच्या प्रेमात पडणे हा सर्वात आनंदाचा क्षण असतो. ब-याच व्यक्ती या प्रेम प्रकरणानंतर फिरायला जातात. आयुष्यातील बराच वेळ या व्यक्तीसोबतच घालवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, काही जणांच्या बाबतीत हे प्रेम अगदी थोड्याच दिवसांचे असते. याची कारणे बरीच आहेत. मग अशावेळी त्या प्रिय व्यक्ती बरोबरच्या आठवणींशिवाय आयुष्यात काहीच उरत नाही. काही व्यक्ती या कठीण प्रसंगातून स्वत:ला सावरत पुढे आयुष्य जगायला सुरूवात करतात. पण ब-याच जणांना या धक्क्यातून सावरतांना कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो.
काही जणांना या प्रसंगी जवळच्या मित्रांकडून मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. पण, ब-याच वेळी हा आधारही कमी पडल्याचे जाणवतो. त्यामुळेच जर तुम्हचे ब्रेकअप झाले असेल आणि तुम्हाला देखील या कठीण प्रसंगातून कसे बाहेर पडायचे याचा मार्ग सापडत नसेल तर आम्ही सांगितलेल्या या टिप्सची तुम्हाला नक्कीच मदत होईल.