आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Love Story About Marathi Commen People In Aurangabad Society News In Marathi

Valentine Day: अडचणींवर मात करत प्रेमाची साथ निभावणार्‍या जोडप्यांची कथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याच्यासाठीच आयुष्य जगावेसे वाटते, मग कितीही अडचणी आल्या तरी चालतील. या ओळींप्रमाणेच व्हॅलेंटाइन डेनिमित्त अनेक अडचणी आणि विरोधांना सामोरे जाऊन आपल्या प्रेमाची साथ निभावणार्‍या जोडप्यांची कथा.

सहा वर्ष लागली सुरळीत व्हायला- योगेश आणि संघश्री राठोड
योगेश सांगतात, आमची भेट कॉलेजमध्ये झाली. एकाच क्लासमध्ये असल्यामुळे आम्ही बेस्ट फ्रेंड बनलो. फ्रेंडशिप वाढत गेली. मग मी तिला प्रपोज केलं. मग एक वर्ष आम्ही रिलेशनमध्ये होतो. नंतर तिच्या आई-वडिलांना समजावलं ते तयार झाले. संघश्री सांगते, सर्वात जास्त त्रास योगेशने सहन केला. जाती वेगळ्या असल्यामुळे लग्नाला विरोध झाला. नंतर माझ्या आई-वडिलांनी आमचं लग्न करून दिलं. त्यानंतर औरंगाबादला आलो. त्यांच्या घरी लग्नाविषयी माहीत नव्हतं. दोन वर्षे ते घरी गेले नाहीत. नंतर आम्हाला मुलगी झाली. त्यानंतर योगेशचा अॅक्सिडंट झाला आणि जवळीक वाढली. त्यानंतर सासू-सासऱ्यांनी मला स्वीकारलं. सगळं सुरळित व्हायला वर्षे लागली. आज मी सासू-सासऱ्यांसोबत आनंदाने राहते. आम्हाला एक मुलगा आणि मुलगी आहे

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, कुटुंबाने शेवटी मान्य केलेच- संदीप आणि माधुरी दाभाडे