आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LOVE STORY: त्‍याच्‍या जगातील तिचं ते पहिलं पाऊल, नवीन आयुष्याची झाली सुरवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निलिमा, होय, निलीमाच. ऋषी आपल्‍या मनाची तयारी करत होता. तिच्‍या खांद्यांची ठेवण. किंचित उंच मानेचा डौल. पार्लरमध्‍ये जाऊन व्यवस्‍थीत कापलेले केस. मेंदी लावलेल्‍या केसांचा मानेवर रूळलेला आंबाडा पाहून त्‍याला खाणा-खुणा आठवू लागल्‍या. तो मनाशी विचार करत होता. निलिमा तुझ्याशिवाय दुसरं कुणीच असू शकणार नाही. तुला समोरुन पाहिल्‍यानंतर अधिक सुंदर दिसतेस की, तुझी पाठमोरी आकृती अधिक सुंदर दिसते. याचं गणित मला आजपर्यंत सुटलेलं नाही. हा विचार ऋषीच्‍या मनात चालू होता. खरं तर हे गणित सोडवण्‍यासाठीच ऋषीला निलिमाचा सहवास हवा होता. यासाठीच कॉलेजला आल्‍यापासून त्‍याचा प्रयत्न चालू होता. आज आपले स्‍वप्‍न पूर्ण होण्‍याची शक्‍यता त्‍याला वाटत होती. ज्‍या दिवसाची तो वाट पाहत होता, तो दिवस आज उजडला होता. तसं त्‍याला तिच्‍याशिवाय दुसरं काही सुचतही नव्‍हतं. एव्‍हाना हे तिच्‍याही लक्षात आलं होतं. आता एकदाच तिला बोलून टाकायचं. त्‍यासाठी तिची गाठ घेणं जरूरीचं होतं. मोठे धाडस करून तिच्‍या मोबाईलवर फोन करुन ऋषीने आज पिंपळाच्‍या झाडापाशी तिला बोलावलं होतं. जो लागले तो, पण आज आपल्‍या नशिबाचा निकाल लावायचा हा निर्णय त्‍याने पक्का केला होता. त्‍यासाठी आपल्‍या मनाची तायारी केली होती.
ठरल्‍याप्रमाणे ती त्‍याची वाट पाहत पिंपळापाशी थांबली. तो लगेच येईल असं तिला वाटलं. पण तिला त्‍याची बारच वेळ वाट पाहावी लागली. इतक्‍यात वा-याची झुळूक आली. पिंपळाच्‍या पानाची सळसळ झाली. थंड वा-याची झुळूक शरिराला स्पर्श करून गेल्‍यामुळे, मन अवघडलेले असले तरी, तिला हायसं वाटत होतं. किती दिवसापासून नजरेनेच भेटणारे आज ते दोघे समोरासमारे भेटत होते. याची जाणिव व्‍हायला तिला वेळ लागला नाही. मन भुतकाळात गिरक्‍या घालू लागलं. अगोदरच्‍या अनेक अबोल भेटी आज तिला आठवत होत्‍या.
पुढे वाचा कशी फुलत गेली यांची प्रेमकाहानी...