आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या मृत्यूनंतर 40 व्या वर्षी नौदलात दाखल होण्याचा तिचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संध्या वाधवा वयाच्या ४० व्या वर्षी नौदलात दाखल झाल्या तेव्हा त्यांच्यासाठी संरक्षण मंत्रालयाने नियमात बदल केला. पतीने मुलांना जसे वाढवले तसे पालनपोषण करण्याची संध्या यांची इच्छा होती. आतापर्यंत नौदलाकडून घेत आले, आता पहिल्यांदा त्यांना काही देत आहे, अशी संध्या यांची भावना आहे. पतीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी त्यांची जबाबदारी अंगावर घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. या निर्णयाप्रत येईपर्यंत त्या नौदलातील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांना वाटले असते तर आरामशीर सरकारी नोकरीही स्वीकारली असती. वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही, पतीच्या माध्यमातून ही संधी मिळाल्याचे त्यांना वाटते. संध्या यांचे वडील नौदलात होते.

एका तरी मुलाने सैन्यात जावे, अशी वडिलांची इच्छा होती. एक मुलगी शास्त्रज्ञ झाली, मुलगा अभियंता असल्यामुळे संध्या यांच्यावर ही जबाबदारी आपोआप आली. २० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. संध्या यांनी हवाई दलासाठी अर्ज केला होता, मात्र त्यात यश आले नाही. गेल्या वर्षी जूनमध्ये फॉर्म भरला आणि नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षणानंतर अधिकारी झाल्या. लाइफ बिगिन्स अॅट फोर्टी हे नुसते ऐकले होते. मात्र, ते सत्यात उतरू शकते हे आता कळाले. अन्यथा बायोलॉजी बॅकग्राउंड असणाऱ्या संध्या यांच्यासाठी नौदलातील तांत्रिक भाषा एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. या वर्षी २६ जानेवारी रोजी कुंतल वाधवा यांना मरणोत्तर नौदल पदक प्रदान करण्यात आले. या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महिला तुकडीचा भाग बनलेल्या संध्या यांनीही इतिहास रचला आहे.

वय : ४० वर्षे
पती : शहीद कमांडर कुंतल वाधवा
शिक्षण : बीएस्सी, एमएस्सी बॉटनी
कुटुंब : नलिन (१४ वर्षे) आणि मुलगी जिया (९ वर्षे)
२०१४ मध्ये आयएनएस कोलकाता दुर्घटनेत पती शहीद.