आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागोवा महाराष्‍ट्राचा: अजित पवारांच्या पावलावर मुंडेंचे पाऊल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वादग्रस्‍त विधान करण्‍यात फक्‍त उपमुख्‍यमंत्री अजित पवारच पुढे नसून आपणही त्‍यांच्‍या तुलनेत कुठेच कमी नसल्‍याचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणुकीस 25 लाख खर्चाची मर्यादा असताना, आपण आठ कोटी रूपये खर्च केल्‍याचे जाहीररित्‍या बोलून मुंडेंनी वाद ओढवून घेतला आहे. आपल्‍या या वक्‍तव्‍यामुळे त्‍यांनी विरोधकांच्‍या हाती आयते कोलीत दिले आहे.

महायुतीमध्‍ये महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचाही समावेश करण्‍यासाठी उतावीळ असलेल्‍या भारतीय जनता पक्षाच्‍या नेत्‍यांना राज ठाकरे यांनी तुर्तास तरी चांगलाच हात दाखवला आहे. मनसेचा महायुतीत समावेश करण्‍याची भाजप नेत्‍यांनी चर्चा थांबवावी अन्‍यथा दोन्‍ही नेत्‍यांच्‍या बैठकीतील तपशील सार्वजनिक करेन, अशी धमकीच राज यांनी दिली. त्‍यामुळे तोंडावर पडलेल्‍या भाजपने मनसेचा विषय आता संपला असल्‍याचे म्‍हटले आहे. पक्षाचे माजी राष्‍ट्रीय अध्‍यक्ष नितीन गडकरी यांनी याचे स्‍पष्‍टीकरण दिले आहे. परंतु, दुसरीकडे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्‍यक्ष यांनीही राज यांना चर्चेचा तपशील जाहीर करण्‍याचे आव्‍हान दिले आहे. त्‍यामुळे महायुतीत मनसेचा समावेश व्‍हावा यासाठी देव पाण्‍यात ठेवणा-यांना अजून काही काळ प्रतिक्षा करावी लागण्‍याची शक्‍यता आहे.

सामान्‍य नागरिक आपले अनेक प्रश्‍ने घेऊन तहसील कार्यालयात जात असतो. अशावेळेस त्‍याला संबंधित अधिका-याकडून किमान मदतीची अपेक्षा असते. परंतु, हे मस्‍तवाल अधिकारी जेव्‍हा पदाचा दुरूपयोग करतात आणि हे सर्व सहनशीलतेच्‍या पुढे जाते तेव्‍हा, सामान्‍य नागरिकही त्‍याला अद्दल घडवण्‍यासाठी काय-काय करू शकतात याचे प्रत्‍यंतर नुकतेच धुळे येथील तहसील कार्यालयात आला. निराधार योजनेत नाव घालण्‍यासाठी शरीरसुखाची मागणी करणा-या स्‍त्री लंपट तहसीलदाराला महिलांनी बेदम मारहाण केली. महिलांच्‍या या 'दुर्गाअवताराने' प्रशासनाची चांगलीच झोप उडाल्‍याचे दिसून आले.

हिमालयाच्‍या मदतीला सह्याद्री पर्वत पुन्‍हा एकदा धावून आल्‍याचा प्रत्‍यय आला. उत्तराखंडमधील नैसर्गिक प्रलयामुळे अडकलेल्‍या लाखो लोकांना लष्‍कराच्‍या जवानांनी जिवाची पर्वा न करता मदतीचा हात दिला. पीडितांची मदत करताना लष्‍कराच्‍या 20 जवानांनाच हेलिकॉप्‍टर दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला. यामध्‍ये खान्‍देशातील 2 जवानांचाही समावेश होता.

'माऊली माऊली' म्‍हणत आपल्‍या लाडक्‍या विठूरायाचे दर्शन घेण्‍यासाठी राज्‍यातून लाखो भाविकांनी पंढरपूरकडे प्रस्‍थान केले. पाऊस चांगला झाल्‍याने यावेळी मोठया संख्‍येने शेतकरी यात सामील होतील असा अंदाज लावला जात आहे.

महाराष्‍ट्रातील अशाच काही घटनांचा आढावा घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाइडला...