आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजपथचे वारे : जाणून घ्या, महाराष्ट्र सदनातील रोजा-रोटी वादामागचे कटू वास्तव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शिवसेना म्हणजे भाषा आणि प्रांतवाद करणारी संघटना! शिवसेना म्हणजे असभ्य लोकांची संघटना. गुंडागर्दीचा महाकळस! शिवसेनेला याहीपेक्षा जहाल शब्दांची बिरुदे लावणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यात बिहारी, उत्तर प्रदेशातील भैय्या, महाराष्ट्राबाहेरील मुस्लिम, महाराष्ट्रातील निवडक अमराठी लोक, काही धर्मांध शक्ती यासोबतच मतांचे राजकारण करु पाहणाऱ्या कॉँग्रेसचाही समावेश आहे.
दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदानातील उपहारगृहाच्या निमित्ताने ‘अविचारी शिवसेना’ असा बागुलबुवा उभा करणाऱ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि संघटनांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. शिवसेनेच्या खासदारांनी केलेल्या आंदोलनाला धार्मिकतेचा साज चढवून हिंदू-मुसलमानांमध्ये दंगल सदृष्य स्थिती निर्माण करणाऱ्या कॉँग्रेसला जाब कोण विचारणार? येथे निवासी आयुक्त असलेल्या बिपीन मलिक सारख्या मराठी द्वेष करणाऱ्या अधिकाऱ्यास वठणीवर कोण आणणार? सदनातील गैरव्यवस्थेबाबत आणि मराठी लोकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत सातत्याने तक्रार करूनही केवळ तोंड रुंदावण्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू न शकणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे किती आदर्शवादी आहेत हेही या निमित्ताने तपासण्याची वेळ आली आहे!
मराठी माणसांचाच तिटकारा असलेले महाराष्ट्र सदन...वाचा पुढील स्लाईडवर