आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SUNDAY SPL: सरकार झुलवतंय जनतेला, बंदी-निलंबनाच्‍या हिंदोळयावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्‍या राज्‍य सरकारचा बंदी घालणे आणि ती उठवणे हा एककलमी कार्यक्रम सुरू असल्‍याचे दिसतेय. बारमधील छमछमबाबत कोर्टाने दिलेल्‍या निर्णयावरील चर्चा थंडावण्‍याच्‍या आतच सरकारने आता तंबाखूजन्‍य पदार्थांवरील बंदीची व्‍याप्‍ती वाढवली आहे. ही बंदी वाढवतानाच त्‍यांनी पोलिस कर्मचा-याला विधानभवनात मारहाण केल्‍याप्रकरणी एक वर्षांचे निलंबन झालेल्‍या पाच आमदारांवरील कारवाईही मागे घेतले. त्‍यामुळे राजकीय विश्‍लेषकांना चर्चेसाठी चर्वितचर्वणच मिळाले आहे. आमदारांच्‍या निलंबनाचा फार्स का केला, असा प्रश्‍नही या पंडितांकडून विचारण्‍यात आला आहे. याचप्रकरणी इलेक्‍ट्रॉनिक मीडियाच्‍या दोन संपादकांवर शिस्‍तभंगाची कारवाई करण्‍यात आली आहे. त्‍याबाबत सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शिवसेनेला त्‍यांच्‍या रांगडया आंदोलनासाठी ओळखले जाते. त्‍यांच्‍या या आंदोलनावर कॉंग्रेस मोठया प्रमाणात टीकाही करते. पण खुद्द कॉंग्रेसच्‍याच कार्यकर्त्‍यांनी मुंबईतील हॉटेल आदित्‍य अशा पद्धतीने बंद पाडले. कारण काय तर त्‍या हॉटेल चालकाने आपल्‍या बिलावर यूपीए सरकारच्‍या भ्रष्‍टाचाराची जंत्रीच दिली होती. ती सहन न झाल्‍याने त्‍यांच्‍याकडून अशी कृती झाली. पण लोकशाहीच्‍या बाता मारणा-या कॉंग्रेसने केलेले हे कृत्‍य शोभनीय आहे काय ? असा प्रश्‍न विरोधी पक्षांकडून विचारला जातोय. महाराष्‍ट्रासाठी या आठवडयातील सर्वात सुखद बातमी म्‍हणजे महाराष्‍ट्राचे ज्‍येष्‍ठ नाट्यकर्मी वामन केंद्रे यांची एनएसडीच्‍या संचालकपदी वर्णी लागली. एका मराठी माणसाची या पदावरील ही पहिलीच निवड ठरली आहे.