आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'‍खलनायक\' संजूबाबा, विधिमंडळातील \'दबंग\' आणि मराठीचे \'कवतिक\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्‍ट्राचे राजकीय वातावरण सध्‍या कमालीचे तापलेले आहे. महाराष्‍ट्राच्‍या दबंग आमदारांनी विधिमंडळाच्‍या परिसरात पोलिस अधिका-याला मारहाण करुन आमदारी 'सफेदी' दाखविली. अशा 'सफेदी'वर निलंबनाची कारवाई झाली. परंतु, या आमदारांच्‍या विरोधात बोलणा-या दोन मराठी वृत्तवाहिनीच्‍या संपादकांविरुद्ध हक्‍कभंगाचा प्रस्‍ताव मांडण्‍यात आला. जनतेच्‍या प्रश्‍नावर एकत्र न येणारे नेते या मुद्यावर मात्र एकसुरात बोलत होते. याचा परिणाम म्‍हणजे वाहिन्‍यांचे 'बूम' दिसल्‍यानंतर पुढे-पुढे करणा-या नेत्‍यांनी आता या 'बूम'वरच अघोषित बंदी घातली आहे. ती किती दिवस टिकते हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरेल. एकीकडे महाराष्‍ट्राच्‍या अस्मितेची अशी धुळवड होत असताना राष्‍ट्रीय चित्रपट पुरस्‍कारांवर मराठीचा डंका वाजला.
ज्‍येष्‍ठ अभिनेते विक्रम गोखलेंसह नवोदित कलाकारांनीही आपले नाणे खणखणीतपणे वाजवले आहे. तब्‍बल 7 पुरस्‍कार मायमराठीला मिळाले.

धुळवडीचाच विषय काढला तर या आठवड्यात महाराष्‍ट्रामध्‍ये आसाराम बापुंची धुळवड वादामुळे गाजली. राज्‍यात मोठा दुष्‍काळ पडलेला असताना आसाराम बापुंनी नाशिक, नागपूर आणि नवी मुंबईत हजारो लिटर पाण्‍याची नासाडी केली. याविरोधात भूमिका घेणा-या पत्रकारांवर आसाराम बापुंच्‍या समर्थकांनी नवी मुंबईत हल्‍ला केला. अखेर बापुंच्‍या होळीवर राज्‍यात बंदी घालण्‍यात आली.

या सर्व वादात एक मोठी घटना म्‍हणजे, 1993 साली झालेल्‍या मुंबई बॉम्‍बस्‍फोटातील आरोपींच्‍या शिक्षेवर सुप्रीम कोर्टाने शिक्‍कामोतर्ब केले. गेल्‍या 20 वर्षांपासून सुरू असलेला न्‍यायालयीन लढा अखेर संपुष्‍टात आला.
हिंदी चित्रपटसृष्‍टीतील 'खलनायक' संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा मिळाली. पण त्‍याची शिक्षा माफ व्‍हावी म्‍हणून आता राजकीय क्षेत्रातील आणि चित्रपटसृष्‍टीतील अनेक व्‍यक्‍ती एक झालेत. उल्‍लेखनीय म्‍हणजे, प्रेस
कौन्सिलचे अध्‍यक्ष मार्कंडेय काटजू यांनीही संजय दत्तची शिक्षा माफ करण्‍याची मागणी केली आहे. उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी दुष्‍काळाच्‍या परिस्थितीतही अर्थसंकल्‍पाचे शिवधनुष्‍य लिलया पेलल्‍याचे भासवले असले तरी, त्‍यांनी मांडलेल्‍या अर्थसंकल्‍पावर मोठया प्रमाणात टीका करण्‍यात येत आहे.

महाराष्‍ट्रातील अशाच काही घटनांचा आढावा घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडवर...