आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागोवा महाराष्‍ट्राचा: अजितदादांच्‍या बोलबच्‍चनगिरीमुळे काका गोत्‍यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्‍ट्राच्‍या नेत्‍यांना झाले तरी काय ? असा प्रश्‍न राज्‍यातील सर्व जनतेला पडला असेल. राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक ठिकाणी बोलताना तारतम्‍य सोडल्‍यानंतर काय होते याचा अनुभव सर्वांनी घेतला. आठवडयाची सुरूवातच अजित पवार यांच्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याने झाली. पाण्‍यावरचे त्‍यांचे हे वक्‍तव्‍य म्‍हणजे ऐन दुष्‍काळात जनतेची केलेला हा अपमान असल्‍याचे म्‍हणत विरोधी पक्षांनी त्‍यांच्‍या विरोधात रान उठवले. आठवडाभर विधीमंडळाचे कामकाजही होऊ दिले नाही. अजितदादांच्‍या या वक्‍तव्‍याचा महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना प्रमूख राज ठाकरे यांनीही ठाकरी शैलीत समाचार घेतला. केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्‍ट्रवादी पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शरद पवार यांनीही यावर खेद व्‍यक्‍त करून चूक झाल्‍याचे कबूल केले. त्‍यामुळे अजितदादांनी शेवटी सपशेल माघार घेत जनतेची माफी मागितली. परंतु, आगामी काळात अजितदादांच्‍या या वक्‍तव्‍याचा राष्‍ट्रवादी कॉंग्रेसला चांगलाच फटका बसण्‍याची शक्‍यता आहे.

गेल्‍या अनेक दिवसांपासून प्रदेश भाजप अध्‍यक्षपदाचा रखडलेली घोषणा अखेर करण्‍यात आली. यंदाचा अध्‍यक्ष मुंडे गटाचा होणार की गडकरी गटाचा याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. मुंडेनी तर आपली प्रतिष्‍ठा पणाला लावली होती. त्‍यामुळे गडकरी गटाला माघार घेऊन मुंडेनी देवेंद्र फडणवीसांच्‍या रूपाने आपल्‍याला हवा तसा अध्‍यक्ष नेमून घेतला. मात्र, फडणवीसांची निवड ही योग्‍य निवड असल्‍याचे राजकीय गोटातून बोलले जाते. फडणवीसांना या सर्वांना बरोबर घेऊन राज्‍यात भाजप सक्षम विरोधी पक्ष असल्‍याचे सिद्ध करून देण्‍याचे आव्‍हान असेल. गेल्‍या आठवडयातील अशाच काही घटनांचा आढावा घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...