आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची गणित विषयात आघाडी, देशपातळीवर मात्र टाॅपर्समध्ये २० टक्के घट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / मुंबई/ पाटणा - सीबीएसईच्या १२ वी इयत्तेतील मॅथ्सची प्रश्नपत्रिका खूप कठीण हाेती. हा पेपर आयआयटी स्तराचा असून आणि तो तीन तासांऐवजी साडेचार तासांत सोडवला जाऊ शकतो, असे काहींचे म्हणणे होते. अशा स्थितीत "दैनिक भास्कर'ने देशात गणित विषयाचा आढावा घेतला. यामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील विद्यार्थ्यांना गणित विषयात विशेष रुची असल्याचे समोर आले आहे.विद्यार्थ्यांचा गणिताबाबत कल कसा आहे, गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा स्तर सतत घसरत आहे काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. देशात सतत मॅथ्सचे विद्यार्थी वाढत आहेत, मात्र १०० टक्के गुण घेणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. एकट्या सीबीएसईमध्ये पाच वर्षांत १२ वीच्या विद्यार्थ्यांची संख्या ८० हजारपेक्षा जास्त झाली आहे. संख्या वाढल्यानंतरही १०० टक्के गुण घेणाऱ्यांची संख्या जवळपास २६ टक्के कमी झाली आहे.

हीच स्थिती १२ वी, बीई, आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० पेक्षा जास्त देशांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मॅथेमॅटिकल ऑलिंपियाडमध्येच नव्हे, तर प्राथमिक शाळांमध्येही आहे. ऑलिंपियाडमध्ये भारत २०१२ मध्ये ११ व्या स्थानी होता. २०१४ पर्यंत तो घसरून ३९ व्या क्रमांकावर आला आहे. ही आतापर्यंतची सर्वांत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. ऑलिंपियाडमध्ये सन २००१ मध्ये भारताला सातवी सर्वांत चांगली रँकिंग मिळाली होती. चीन सलग दोन वर्षे क्रमांक एकवर होता. गुणवत्ता घसरण्याचा कल कनिष्ठ स्तरावरही आहे.

शिक्षण क्षेत्रात कार्यरत संस्था प्रथमने यावर्षी जानेवारीमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, देशाच्या ग्रामीण भागात सन २०१२ मध्ये तिसऱ्या वर्गातील २६.३ टक्के विद्यार्थीच एक ते दहा आकड्यांची वजाबाकी करू शकत होते. २०१४ मध्ये या संख्येत घट होऊन केवळ ११.९ टक्के विद्यार्थीच एक ते नऊपर्यंत अंक आेळख करू शकत होते. २००९ मध्ये हा स्तर १९.५ टक्के राहिला होता. २०१४ मध्ये पाचवी ते आठवीपर्यंतचे ४४ टक्के विद्यार्थी भागाकार करण्यात सक्षम होते.

सीबीएसईमध्ये ए वन ग्रेडचे गुण सन २०११ मध्ये ९३-१०० हून घटून सन २०१३ मध्ये ९१-१०० वर आले. चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संचालक राजीव लक्ष्मण करंदीकर म्हणाले, सुरुवातीस गणिताचे प्रश्न सोडवणे कठीण होते, मात्र संगणकामुळे प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया सरळ झाली आहे. मोबाइल, कॉम्प्युटर आणि कॅल्क्युलेटरमुळे वैयक्तिक स्तरावर गणनेचा स्तर कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गणित विषयाच्या बाबतीत भारताची स्थिती सध्या चांगली आहे. मात्र, चीन, अमेरिका, जपान आणि ब्रिटनव्यतिरिक्त इराण, दक्षिण कोरिया आणि पूर्व युरोपचे देशही स्पर्धा करत आहेत. देशात पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थ्यांना गणिताची आवड आहे.

मध्य प्रदेशच्या असोसिएशन ऑफ टेक्निकल प्रोफेशन इन्स्टिट्यूटचे सचिव बी. एस. यादव म्हणाले, शालेय पातळीवर गणित विषयाच्या अध्यापन प्रक्रियेत सुधारणा आवश्यक आहे. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी संघर्ष सुरू आहे. बीईमध्ये मॅथ्स असणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एमवन, एमटू आणि एमथ्री पेपरमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सेमिस्टर बॅक राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. द असोसिएशन आॅफ मॅथेमॅटिक्स टीचर्स ऑफ इंडियाचे सरचिटणीस एम. महादेवन म्हणाले, मॅथ्स विषयाला प्राधान्य देण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे त्यातून मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी हे प्रमुख कारण आहे. इंजिनिअरिंग, फायनान्सव्यतिरिक्त कॉम्प्युटर सायन्स, बायो टेक्नॉलॉजी, एवढेच नव्हे, तर मेडिकल सायन्ससारख्या विषयांमध्येही गणिताचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे गणित विषयाकडे विद्यार्थी आकर्षित होत राहतील.

बिहारमध्ये घट, छत्तीसगडमध्ये वाढ
बिहारमध्ये १२ वीत गणित विषयात प्रथम श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट आली आहे. छत्तीसगडमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली आहे, मात्र त्यांच्या संख्येत सन २०१४ मध्ये तीन हजारांची घट आली आहे. दहावीत गणिताचा पेपर १५० हून १०० गुणांचा करण्यात आला. मॅथ्स ऑलिंपियाडसाठी १९९६ नंतर पहिल्यांदा गेल्या वर्षी भोपाळच्या सर्वेश मित्तलची निवड झाली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काही महत्त्वाची माहिती...