आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन:शांती कायम ठेवण्याचा संकल्प करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्या मनावर आरूढ होऊन तुमची मन:शांती बिघडवण्याचा अधिकार कोणतीही व्यक्ती, कोणतीही घटना वा कोणत्याही अनुभवाला नाही. कोणी काहीही करत असेल, किंवा कुणाबरोबर काय होत असेल, यामुळे मन आणि बुद्धीची शांती प्रभावित होऊ नये. नव्या वर्षात असाच एखादा संकल्प तुमच्या मनात असला पाहिजे.
जे जसं चालू आहे, ते तसं नेहमीच चालत राहील, पण कोणत्याही परिस्थितीत मनाच्या शांतीवर याचा परिणाम होऊ देऊ नये, शारीरिक आणि भावनिकही. ज्या गोष्टींमुळे तुमचे चित्त विचलित होते, ते डोक्यातून काढून टाका. ज्याला जे करायचंय ते करू द्या. तुमच्या मनाची शांती सर्वात महत्त्वाची आहे. तुमच्या अंतर्मनात एक तर फुलांचा गुच्छ आहे किंवा अ‍ॅसिड तरी भरलेलं आहे. तुम्ही जेव्हा दु:खी असता तेव्हा तुमच्यातील चांगले अंतर्मन प्रभावित होते. तुम्ही तुमची उपेक्षा करत आपल्या अनुभवाच्या आधारावर दु:खी होत जीवनाचा पुढचा प्रवास करू लागता. जगाने केलेली उपेक्षा आणि अपरिपक्वता यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. पण तुमच्या पातळीवर काही करू शकता. एखाद्याचा द्वेष अथवा किंवा नापसंती यामध्ये याचा द्वेष केला जातो, तो अधिक दु:खी होतो. तुम्ही करत असलेल्या द्वेषामुळे एखाद्याला रात्री झोप लागत नसेल अथवा कुणाला अल्सर किंवा अ‍ॅसिडिटीही होत असेल. एकूण काय, तुमच्या मनाची शांती प्रभावित होत असेल. मग दु:खी झाल्यावर काय होतं? कोणाला कोणताही लाभ होत नाही, उलट नुकसानच होते.
भौतिक किंवा मानसिक रूपाने तुम्ही जेव्हा दु:खी होता, तेव्हा त्याचा तुम्ही पुनरुच्चार करत राहता आणि शेकडो वेळा तुमचा अपमान आठवत राहतो. जेवढे तुम्ही हे आठवत राहाल तेवढी जखम अधिक खोलवर होत जाईल. या जखमेचा तुमच्यावर बराच काळ प्रभाव राहील. कारण शांतीची किंमतच तुम्हाला माहीत नाही. तेव्हा मला म्हणायचंय हे की, उपेक्षा आणि अपरिपक्वता याच्यामुळेच तुम्ही स्वत:ला दु:ख देत आहात. असं धरून चाला की, एखादा तुमच्या दृष्टीने चुकीचा असेल तर तुम्ही त्याला आपल्या मनात प्रवेश न देता बाहेरच ठेवा. आपल्या बुद्धी आणि हृदयात त्याला जागा देऊ नका. ज्या गोष्टी शांतीचा स्रोत आहेत, त्यांनाच मन आणि बुद्धीत प्रवेश करू द्या. तुम्ही जेव्हा जर शांत असाल तरच सुंदर दिसाल. हे सर्व तुमच्या हातात आहे. सोडून द्या,जाऊ द्या, हा विचार पाहा.