आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेता होण्यासाठी पालकत्व प्रक्रिया नीट समजून घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका कंपनीने कुत्र्याचे एक खाद्य बाजारात आणले. वर्तमानपत्र आणि टीव्हीवरील जाहिरातींमुळे सुरुवातीला त्याची चांगली विक्री झाली. काही महिन्यांनंतर या खाद्याची विक्री कमी होऊ लागली. विक्रीतील घट होण्यामागील कारण शोधण्यासाठी कंपनीने एक संशोधन केले. त्यातून असे निष्पन्न झाले की, कुत्र्यांना या पदार्थाची चवच अवडली नाही.

एखाद्या उत्पादनाची किंमत काय आहे, त्यावर कशा प्रकारचे वेष्टण आहे, उत्पादनाची वितरणप्रणाली किती शक्तिशाली आहे किंवा उत्पादनात किती पोषक घटक आहेत, या गोष्टींमुळे काहीही फरक पडत नाही. कुत्र्यांना या पदार्थाची चव आवडणे, हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे उत्पादन तयार करताना मालकाऐवजी आधी कुत्र्याच्या खाण्याच्या सवयींचा विचार करायला हवा.
कोणताही विषय हाताळताना ‘यात माझ्यासाठी काय आहे’ हाच मूळ प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडलेला असतो. काहींना धन संपत्तीमुळे प्रोत्साहन मिळते, तर काही जण वातावरणामुळे उत्साही होतात. काही लोकांना आव्हान देण्याची गरज असते, तर काहींना शांत वातावरणात काम करायला आवडते. काही जणांवर खूप दबाव टाकल्यासच उत्तम काम दिसून येते.

एकच युक्ती सर्वांसाठी लागू पडत नाही. त्यामुळे प्रत्येकावर प्रभावी ठरेल, असे एक माध्यम शोधून काढणे आवश्यक असते. प्रत्येक व्यक्तीची विशिष्ट गरज असते, काही वैशिष्ट्ये असतात, काही ध्येय असतात. प्रत्येकाला इच्छा-आकांक्षा असतात. अशा प्रकारे आपणा सर्वांमध्ये एकसारखी वैशिष्ट्ये असून आपण वेगवेगळे आहोत. प्रत्येकाच्या मताचा विचार करून त्यावर चर्चा करणे, हा उत्तम पर्याय आहे. एखादी व्यक्ती जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते, हे तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत तुम्ही तिला, जग कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, हे समजावून सांगू शकत नाहीत. नेतृत्वाच्या बाबतीतही हीच प्रक्रिया आहे. ती नीट समजून घ्या.