आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एकेकाळी रिझर्व्ह बँकेने एक ग्रामीण महिला बँक चालवण्याची परवानगी देण्यास नकार दिला होता.आपल्या संस्थेला बँकेचे स्वरूप देण्यासाठी अशिक्षित ग्रामीण महिलांमध्ये सुशिक्षित होण्याची जिद्द आहे आणि त्यासाठी त्या मानसिक तयारी करू लागल्या आहेत, हे देशाच्या या मध्यवर्ती बँकेच्या लक्षात आले. ते पाहून रिझर्व्ह बँक प्रभावित झाली आणि काही मूलभूत प्रशिक्षणानंतर परवानगी देऊन टाकली. या महिलांचे प्रेरणास्थान चेतना सिन्हा यांच्यातील ऊर्जेसंबंधी...
चेतना सिन्हा यांच्याकडे आज लक्ष्मीचे पाठबळ आहे. एकेकाळी त्या एका सर्वसामान्य शेतक-याची पत्नी होत्या. त्यांनी ग्रामीण महिलांचे सबलीकरण करत एक ग्रामीण बँक स्थापन केली. त्याचबरोबर त्या एक बिझनेस स्कूलही चालवतात. त्यांचा एकूणच भर ग्रामीण महिलांना उद्यमशील बनवण्यावर राहिला आहे. त्यासाठी त्यांना अनेक खाच खळग्यातून जावे लागले.
1982 मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र व वाणिज्य विषयात पदव्युत्तर झाल्यानंतर त्या त्यांच्या शेतकरी पतीबरोबर राहू लागल्या. आव्हानांपासून दूर पळण्याऐवजी त्यांना त्या सामोरे गेल्या. त्यांनी एक संघटना स्थापन केली. ही संघटना महिलांना शिक्षण देत आहे. मग त्यांनी बिझनेस स्कूलची सुरुवात केली. तेथे महिलांसाठी एक दिवसांपासून ते 45 दिवसांपर्यंत प्रशिक्षण कार्यक्रम आहेत. या बिझनेस स्कूलमध्ये आजपर्यंत 24000 महिलांनी प्रशिक्षण घेतले. 2020 पर्यंत 10 लाख उद्यमशील महिला तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
आमची बँक चालवणा-या बहुतांश महिला पदवीधरही नाहीत, परंतु प्रशिक्षणानंतर त्या उत्कृष्ट काम करू लागल्या आहेत, असे चेतना सिन्हा सांगतात. एका मुलाखतीत त्यांनी ग्रामीण महिलांच्या यशकथा सांगितल्या. एक दलित महिला एका मंदिराच्या परिसरात फोटो फ्रेम आणि फुले विकत होती. दलित असल्यामुळे गावातील लोक तिच्याकडून खरेदी करायला मागेपुढे पाहत होते. तेव्हा चेतनाच्या संघटनेने तिला दुस-या गावात जाऊन सामान विकायला सांगितले. तेव्हा त्या महिलेला चांगले यश मिळाले.
लेखक अमेरिका आणि जपानमध्ये प्रेरक वक्ते म्हणून कार्य
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.