आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिसण्यातील वेगळेपणासाठी मेकअप हायलाइट करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब-याचदा महिला मेकअप हायलाइट करणे विसरतात. हायलाइट व शॅडो इफेक्टने चेहरा नितळ दिसू लागतो. फीचर्सही शार्प होतात. योग्य पद्धतीने हायलाइट केल्यास चिकबोन्स उठून दिसतात. चेहरा सडपातळ दिसतो.

हायलायटिंगसाठी मेकअप ब्रश योग्य असणे गरजेचे आहे. नाकावर हलक्या व सरळ स्ट्रोकसाठी स्लिम व नॅरो ब्रशचा वापर करा. आयशॅडो ब्रश वापरून आयब्रो हायलाइट करा. गालासाठी लहान व गोलाकार ब्रशचा वापर करा. मेकअप स्किनशी ब्लेंड होण्यासाठी बफिंग ब्रश योग्य ठरेल. अँगल्ड ब्रशने मेकअप हायलाइट करणे सोपे आहे. मेकअपमध्ये कलरची योग्य निवड करणे आवश्यक आहे. इंडियन स्किनसाठी पिची गोल्ड किंवा लाइट गोल्डन हे रंग योग्य ठरतील. हे रंग नॅचरल दिसतात आणि चेह-यालाही हेल्दी ग्लो मिळतो. डिनर, पार्टी किंवा नाइट आउटसाठी शिमरचा वापर करा. त्याने चेह-याला ग्लॅमरस लूक मिळेल. तो चेह-याशी योग्य पद्धतीने ब्लेंड करणे आवश्यक आहे. चेह-यावर पर्ल व्हाइट किंवा पिंक कलर अजिबात वापरू नका.

चेहरा सडपातळ दिसण्यासाठी चिकबोन आणि नाकाला हायलाइट करा. नाकावर कोणताही रंग लावू नका. गालांना ब्लश किंवा ब्राँझरने हायलाइट करा. कपाळाची रुंदी कमी दिसण्यासाठी हेअरलाइन हायलाइट करा. हनुवटी हायलाइट केल्यास जॉ लाइनचे सौंदर्य खुलून दिसेल. मेकअपमध्ये एखादी चांगल्या रंगाची लिपस्टिक किंवा लिप ग्लॉसने कम्प्लीट लूक मिळेल. - प्रिव्हेन्शन नियतकालिकातून

विद्या तिकारी, मेकअप आर्टिस्ट, दिल्ली