Home | Divya Marathi Special | maldhok bird in gwalior

ग्वाल्हेर परिसरात आढळले माळढोक

हरेकृष्ण दुबोलिया (ग्वाल्हेर) | Update - Jun 04, 2011, 01:18 PM IST

घाटी गावातील सुप्रसिद्ध माळढोक अभयारण्यात 10 माळढोक असल्याचा अंदाज आहे.

 • maldhok bird in gwalior

  घाटी गावातील सुप्रसिद्ध माळढोक अभयारण्यात 10 माळढोक असल्याचा अंदाज आहे. येथे चालू असलेले खोदकाम आणि गडबड, गोंधळ जर बंद झाला नाही तर माळढोक नष्ट होण्याची शक्यता आहे. पूर्ण देशात अशा प्रकारचे फक्त ३00 पक्षी शिल्लक राहिले आहेत, असे वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, डेहराडूनचे शास्त्रज्ञ सुतीर्थ दत्ता यांनी सांगितले.

  घाटी गावात माळढोक असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत. मात्र, अभयारण्यातील परिस्थितीमुळे त्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. त्या पक्ष्यांना राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती उपलब्ध करून दिली पाहिजे. माळढोक फक्त भारतात सापडतात. पूर्ण देशात केवळ 300 माळढोक आहेत, असा अंदाज आहे. यातील 10 पक्षी घाटी गावातील अभयारण्यात असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. या अभयारण्यात 2009 नंतर एकही माळढोक असल्याचे कोणीही पाहिले नाही. मात्र, 2010 मध्ये त्या पक्ष्यांची विष्ठा आणि त्यांचे पंख यांच्या डीएनए चाचणीनुसार हे सोनचिरैया पक्षी या अभयारण्यात असल्याच्या गोष्टीला आधार मिळालेला आहे. दत्ता यांनी या जागेची आेळख होण्यासाठी हा परिसर पाहणार असल्याचे सांगितले. या अभयारण्यात जेथे जेथे माळढोक पक्षी आढळण्याची शक्यता आहे तेथे असलेल्या गावक:यांच्या वर्दळीला आणि इतर प्राण्यांच्या प्रवेशावर बंदी आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याचा काळ म्हणजे हा या पक्ष्यांचा प्रजनन काळ आहे.

  हे पक्षी काय खातात?
  माळढोक हे पक्षी शाकाहारी आणि मांसााहारी आहेत. कीटक, साप, विंचू, पाल, भुंगा, नाकतोडा आणि धान्याचे दाणे खातात.

  असा आहे माळढोक

  स्थानिक नाव हुकना
  जैवशास्त्रातले नाव ग्रेट इंडियन बस्टर्ड
  वजन 10 ते 15 किलोग्राम
  वय 20 वर्षे
  स्थान पश्चिम भारत

  या पक्ष्यांवर आलेले संकट
  माळढोक पक्ष्यांची शिकार आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्यावर अनेक प्रकारची संकटे आल्याचे आढळते. त्यामुळे हे पक्षी जास्त करून दिसत नाहीत. जवळ जवळ हे पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते. मोगल बादशहा बाबर यांच्या काळात या पक्ष्यांची शिकार करणे सुरू झाले. इंग्रजांच्या काळात या पक्ष्यांची शिकार जास्त प्रमाणात होत असे. 1970 च्या काळात या पक्ष्यांची संख्या घटत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा झालेल्या पशू-पक्षी यांच्या मोजणीत हे आढळले. तेव्हा भारतात एकूण 1300 सोनचिरैया शिल्लक राहिलेल्या होत्या. 2006 मध्ये त्यांच्या संख्येत घट होऊन फक्त 300 माळढोक शिल्लक राहिल्याचे आढळले. त्यानंतर त्यांची मोजणी झाली नाही.

Trending