आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा : छोट्याशा एक्स्चेंज प्राइसद्वारे मिळवा आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमचा जुना एलईडी टीव्ही अधिकृत आणि अनधिकृत सेंटर्सवर दुुरुस्त करण्यामध्ये अपयशी ठरल्यानंतर या महिन्यात आम्हाला नवा टीव्ही खरेदी करावा लागला. कारण माझी मुलीला टीव्हीशिवाय घरामध्ये करमत नव्हते. जेव्हा टीव्ही घरी आला त्या दिवशी डिलिव्हरी करणाऱ्यास माझ्या फ्लॅटचा रस्ता एका शेजाऱ्याच्या मोलकरणीने दाखवला. ती नवीन टीव्ही उघडून पाहण्यासाठी उत्सुक झाली होती. संधी पाहून तिने हळूच विचारले, ‘तुम्ही आता जुन्या टीव्हीचे काय करणार?’ (तिच्या प्रश्नामध्ये विनंती होती... तुम्ही तुमचा जुना टीव्ही आम्हाला देणार का?) एका क्षणासाठी मला वाईट वाटले. मागील ३० वर्षांमध्ये जेव्हापासून माझे स्वत:चे घर आहे तेव्हापासून मी पाच टीव्ही बदलले आहेत आणि नवा टीव्ही नेहमीच चांगल्या तंत्रज्ञानामुळे आणण्यात आला. कधीच कोणता टीव्ही खराब झाला नव्हता. माझ्या घरातून बाहेर जाणारे चारही टीव्ही संच कुणाच्या ना कुणाच्या घरी गेले आहेत. 
 
ही गोष्ट मी कुटुंबीयांना सांगितली तेव्हा पत्नी म्हणाली होती, ‘तुमच्या चेहऱ्यावर मुलांसारखा आनंद दिसतोय.’ होय, एखादे महागडे गॅजेट खरेदी केल्यानंतर मला खरंच आनंद व्हायचा. कारण एखाद्यासाठी तरी माझी जुनी वस्तू कामी यायचीच. जुना टीव्ही वॉचमन किंवा मोलकरणीला देण्याचे पहिले कारण म्हणजे कोणीही रंगीत टीव्ही ५०० रुपयांत खरेदी करू शकत नाही. हीच किंमत मोठे शोरूम तेव्हा एक्चेंज प्राइसमध्ये ऑफर करत होते. आज तीच शोरूम बंद टीव्हीसाठी १००० रुपये ऑफर करत आहे आणि चालू टीव्हीसाठी १५०० रुपये देत आहे. ते टीव्ही माझ्या घरातून घेऊन जायचे आणि एखाद्या ई-वेस्ट सेंटरवर त्याची विल्हेवाट लावली जायची. अनेक प्रयत्न केल्यानंतरही माझा जुना टीव्ही दुरुस्त होऊ शकत नाही, असे मी मोलकरीणला म्हणालो तेव्हा ती नाराज झाली. कारण मी तिला जुना टीव्ही भेट म्हणून देणार, या आशेने ती माझ्याकडे आली होती. या तीन दशकांमध्ये दोन रेफ्रिजरेटर आणि एक-एक होम थिएटर आणि मिक्सरही कधीच एक्स्चेंज ऑफरमध्ये कोणत्याच दुकानदारास दिलेला नाही. ते कुणाला ना कुणाला दिले आहेत. 
 
या घटनेनंतर गेल्या पंधरवड्यापासून डिनर टेबलवर आमची हीच चर्चा व्हायची की, कसे नियोजनबद्ध पद्धतीने गजेट निर्मात्यांनी सर्व प्रकारच्या उत्पादनांचा दर्जा कमी केला आहे. काळासोबत आपण दुरुस्ती करून वापरण्याऐवजी अनेक उत्पादने फेकून देत आहोत. अमेरिकन स्टाइलची ही जीवनशैली मानवतेकडून मोठी किंमत वसूल करेल, हा माझा पेटंट डायलाॅग आहे, पण माझी मुलगी याला सहजपणे घेते. का कुणास ठाऊक नवा टीव्ही आल्यानंतर माझा टीव्ही पाहण्याचा वेळ कमी झाला आहे, असे माझ्या मुलाला वाटत होते. तथापि, हे खरे नाही. कारण मी आधीपासूनच जास्त टीव्ही पाहत नाही. माझ्या मुलीने ही घटना आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली आणि दोन दिवसांपूर्वी ज्या मोलकरणीला मी माझा जुना टीव्ही देऊ शकलो नव्हतो, त्या मोलकरणीला भेट म्हणून देण्यासाठी एक जुना टीव्ही आमच्या घरी आला. माझ्या मुलीने तो टीव्ही आपल्या ग्रुपच्या एका सदस्याकडून १५०० रुपयांत विकत घेतला होता. एवढीच किंमत त्या सदस्याला एक्स्चेंजच्या रूपात ऑफर करण्यात आली होती. त्या दिवशी निराश परतलेल्या शेजाऱ्याच्या मोलकरणीला जेव्हा हा टीव्ही भेट म्हणून दिला तेव्हा तिचा चेहरा पाहण्यासारखा होता. तिच्याकडे आभार व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. 
 
फंडा असा आहे की : आनंद अनमोल आहे; पण कधी-कधी तो छोटीशी एक्स्चेंज प्राइस देऊनही मिळवता येतो. 
 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...