आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा : आवडीप्रमाणे जगले तरच आनंद मिळतो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
लोकांना सध्या तत्काळ सुख हवे असते. आपण करत असलेल्या कामाचा भविष्यात फायदा होईल का, याची काळजी त्यांना नसते. आपले काम आणि स्वार्थाची किंमत त्यांना नक्कीच चुकवावी लागते. स्टाइलमध्ये आयुष्य जगण्याच्या बाबतीत नवीने पिढी जास्त स्मार्ट आहे. लोक काय म्हणतील याची काळजीही त्यांना नाही. 
 
स्टोरी: मणिपूरला जन्मलेली आणि तेथेच वाढलेल्या शैला भटने कम्युनिकेशनमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने कॉर्पोरेट जगात कामाला सुरुवात केली. असे असले तरी तिने आपल्या आवडीला प्राधान्य दिले. नृत्याच्या आपल्या आवडीला तिने जोपासले. शामक डावरच्या परफॉर्मिंग आर्ट इन्स्टिट्यूटमधून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्यानंतर पाच वर्षांनी तिने झुंबा या नृत्यप्रकारातही प्रावीण्य मिळवले. आज ती दोन क्षेत्रात आपले करिअर करत आहे. झुंबा फिटनेस ट्रेनर आणि फ्रीलान्स पब्लिक रिलेशन कन्सल्टंट म्हणून ती सध्या काम करत आहे. तिच्याकडे भरपूर काम असूनही ती सध्या आनंदी आहे. आपल्या कामात परफेक्ट होण्यासाठी तिने एरोबिक्स अँड फिटनेस असोसिएशन ऑफ अमेरिका या संस्थेतूनही सर्टिफिकेट मिळवले आहे. या सर्टिफिकेटच्या जोरावरच तिला प्यूमातील डू यू कँपेनमध्ये काम करण्याचीही संधी मिळाली होती. हा कॅम्पेन महिलांच्या फिटनेसबाबत काम करतो. आठवड्यातून एकदा शैला महिलांसाठी मोफत फिटनेस प्रशिक्षण देते. सध्या तिने बंगळुरू शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. तेथील आयटी वुमन वर्कफोर्स सध्या बैठ्या कामाला प्राधान्य देत असल्याने महिलांच्या आरोग्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तिने आपले क्लास सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सेशनमध्ये ठेवले आहेत. मधल्या वेळेत ती पीआर एजन्सीकडे लक्ष देते. 
 
स्टोरी: कुशलदिवसभर आपल्या अॅडव्हर्टायझिंग एजन्सीला वेळ देतो आणि रात्री तो आपली आवड जपतो. रात्री तो सोशल सर्व्हिस करत गरजवंतांच्या मदतीला धावतो. आपली आवड आपल्या पोट भरण्यासाठी पुरेशी नाही हे कुशलला माहीत असल्याने त्याने अॅडव्हर्टायझिंग एजन्सी चांगल्या प्रकारे नावारूपाला अाणली. आवड आणि काम या दोन्हीत त्याने चांगले संतुलन ठेवले आहे. २०१४ मध्ये त्याने ‘डोनेट अनयुज्ड’ नावाचे एक कॅम्पेन सुरू केले. घरातील वापरात नसलेल्या गोळ्या आणि आैषधे गरजू रुग्णांना देण्याचे आवाहन या कॅम्पेनद्वारे करण्यात आले होते. त्याच्या या उपक्रमाला अनेकांनी प्रतिसाद देत अनेक दात्यांनी वापरात नसलेले समान, कपडे, पुस्तके, खेळणी आदी वस्तूंही गोळा करण्याचे कुशलला सुचवले होते. त्यानंतर त्याने एक अॅप्रोप्रिएट सिस्टिम तयार केली. हैदराबाद येथील कुशाइगुडा पोलिस स्टेशनच्या शेजारी त्याने ड्रॉप बॉक्स लावला. तेथे दात्यांनी आपल्या वस्तू जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या Donateunused.com या वेबसाइटच्या माध्यमातून हा उपक्रम सध्या डिजिटल झाला आहे. दाते आणि गरजवंत अशा दोन्हीचा शोध कुशल सध्या घेत आहे. 
 
स्टोरी: राजूगनिजा कर्नाटकमधील कुंटपूर येथील पीडब्लूडी विभागात इन्स्पेक्टर आहेत. या भागात चांगला पाऊस होतो. सिमेंटच्या मोकळ्या गोण्यांनी त्रस्त झालेल्या राजू यांनी या गोण्यांचा वापर शेतीसाठी करण्याची कल्पना लढवली. मुळात शेतीवर त्यांचे पहिल्यापासून प्रेम होते. सिमेंटच्या मोकळ्या गोण्यांमध्ये माती भरून त्यातून भेंडीची शेती करण्याचा प्रयोग त्यांनी केला. सुरुवातीला ३० किलोचे उत्पन्न मिळाले. आज त्यांचे हे उत्पन्न ६० किलोपर्यंत पोहोचले आहे. आपल्या शेतात राजू यांनी सुपारीची ३० झाडेही लावली आहेत. तसेच नारळ आणि वेगवेगळ्या भाजीपाल्याचा प्रयोगही सुरू आहे. स्वत:साठी राजू यांनी किचन गार्डनही तयार केले आहे. शेतीमुळे माणूस स्वावलंबी होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. 
 
फंडा असा आहे की : आयुष्य जगताना आपल्याला जे आवडते त्यात करिअर करायला हवे. जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे आयुष्य जगण्यात आनंद मिळत नाही. जगाप्रमाणे जगायचे ठरवले तर आपण अानंद गमावतो. 
 
एन. रघुरामन 
मॅनेजमेंटगुरू 
raghu@dbcorp.in
 
-एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 वर 
बातम्या आणखी आहेत...