आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा : तुमची छाप सार्वजनिक ठिकाणच्या वर्तणुकीवरून कळते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
शुक्रवारी जेव्हा मी माझ्या हातातील विशेष निमंत्रण पत्र घेऊन मुंबईतील एका सभागृहात पोहोचलो तेव्हा माझ्या आसपासचे लोक ‘नो फ्लाई’ या विषयावर चर्चा करताना मला दिसले. जे लोक विमान यात्रेदरम्यान चुकीचे वागतात त्यांच्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. या नियमानुसार आयष्यभरासाठी विमान प्रवासाला बंदी करण्यात येऊ शकते. प्रत्येक जण त्याला विमान प्रवासात आलेले बरे-वाईट अनुभव सांगत होता. माझ्या समोर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता, बॉलीवूडचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, गोविंदा आणि त्याची पत्नी, बोनी कपूर, शामक डावर असे दिग्गज होते. ‘सिनर्जी इंडो-जॉर्जीयन फ्युजन’ नावाचा नृत्याचा हा कार्यक्रम हेमा मालिनी यांच्या आई जया चक्रवर्ती यांच्या आठवणीत आयोजित करण्यात आला होता. हेमा मालिनी परफेक्ट होस्टच्या भूमिकेत होती आणि प्रमुख पाहुण्यांसह तीसुद्धा मुख्य रांगेत बसली होती. माझ्यासह सगळ्यांना उत्सुकता होती की, जर हेमा मालिनी पहिल्या रांगेत बसल्या आहेत तर मग कार्यक्रमाची सुरुवात कोण करणार? जेव्हा सगळे प्रमुख पाहुणे आले तेव्हा त्या विशाल मंचावर अचानक अंधार झाला. मंचाच्या एका कोपऱ्यातून मोठा प्लॅश आला आणि काळ्या रंगाचा सुट घातलेला एक देखणा रुबाबदार तरुण आला. तो दुसरा तिसरा कुणी नसून बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान होता. मंचावर आल्यावर तो विनम्रतापूर्वक म्हणाला, ‘जेव्हा मला हेमा मालिनी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याबाबत विचारले तेव्हा मी त्यांना नकार देऊ शकत नव्हतो, कारण जेव्हा मी कुणीच नव्हतो तेव्हा हेमाजींनी मला खूप प्रोत्साहित केले होते.’ शाहरुखने हेमाजींना मंचावर येण्याची विनंती केली. हेमाजींनी भारत आणि जॉर्जीया या दोन देशांमधील सांस्कृतिक आदान-प्रदान या विषयावर माहिती दिली. अन्य कार्यक्रमाप्रमाणे या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनही हेमा मालिनी, गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलनासाठी आणलेल्या समईतील पाच वाती पेटत नव्हत्या. तीनही प्रमुख पाहुणे हातात मेनबत्त्या घेऊन त्या वाती पेटवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्या वाती पेटत नव्हत्या. तेव्हा याच हिरोने खास स्टाइलने त्या मेनबत्या पेटवण्यासाठी प्रमुख पाहुण्यांची मदत केली. सभागृहातील कॅमेऱ्याद्वारे मोठ्या स्क्रिनवर हे दृश्य शेवटच्या माणसापर्यंत गेले आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. 
 
चित्रपटातील हीरो आपल्याला आवडतो. कारण ते सगळ्या मर्यादांच्या बाहेर जाऊन सामान्यांची मदत करतात. त्यांच्यात इतरांपेक्षा जास्त क्षमता असल्याने ते कुणालाही मदतीचा हात देतात आणि अगदी अल्पावधीत विजयीही होतात. त्या सभागृहातील सगळे कॅमेरे शाहरुखच्या चेहऱ्यावर होते. त्याची कृतज्ञता आणि विनम्रता सगळ्या सभागृहाने पाहिली. त्याच्या नम्रतेला टाळ्यांचा सन्मानही दिला गेला. मंचावर असताना शाहरुखला एकाक्षणी जाणवले की हा कार्यक्रम हेमाजींंचा आहे आणि प्रमुख पाहुणे उपस्थित असताना आपण मंचावर जास्त वेळ थांबणे योग्य नाही. त्यानंतर त्याने सूत्रसंचालकाच्या हातात माइक देऊन मंचावर खाली येणे पसंत केले. मंचावर हेमाजींच्या हातात सूत्रसंचालकाने दोन बुके दिले तेव्हा हेमाजींनी खाली बसलेल्या शाहरुखला स्टेजवर घेऊन जात प्रमुख पाहुण्यांचा त्याच्या हस्ते सत्कार केला. शाहरुखला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचे असल्याने तो या कार्यक्रमाला फक्त १४ मिनिटेच हजर होता मात्र तेवढ्या वेळेत त्याने उपस्थिंतांची मने जिंकली. 
 
दोन तासांचा हा कार्यक्रम अपेक्षेप्रमाणे सुपर हिट ठरला. जॉर्जीयाच्या ‘सुखीशविली’ नावाच्या या आंतरराष्ट्रीय बॅले ग्रुपने यापूर्वी जगभर आपली छाप सोडली आहे. अल्बर्ट हॉल, कोलिजियम, मेट्रोपोलिटन ऑपेरा आणि इटलीच्या मिलान स्थित टिट्रो अलास्कॅल आदी मंचावर या ग्रुपने आपली कला सादर केली आहे. कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांच्या तोंडी शाहरुखची विनम्रता होती. कार्यक्रमापूर्वी चर्चेत असणारे ‘नो फ्लाई रुल्स’ आता कुठल्या कुठे विरून गेले होते. सगळ्या हीरोंच्या गर्दीत सुपर हीरो कसे व्हायचे, हे प्रत्येक हीरोला माहीत असते. 
 
फंडा असा आहे की : आपल्यासार्वजनिक ठिकाणी मोठ्या माणसांकडे सर्वांचे लक्ष असते. तेथील आपला व्यवहारच आपल्याला मोठे करत असतो. 
 
एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 वर 
बातम्या आणखी आहेत...