आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: स्वच्छ पर्यावरण हीच नव्या पिढीसाठी भेट!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील निम्म्यापेक्षाहीअधिक लाेकसंख्या शहरातच असते अाणि सन २०५० पर्यंत अाणखी २.५ अब्ज लाेक शहरांमध्ये दाखल हाेतील. ज्या पद्धतीने अापण नव्या शहरांची निर्मिती करू ते सर्व मुद्दे केंद्रस्थानी असतील. जलवायू परिवर्तनापासून ते अार्थिक जिवंतपणा अाणि स्वहितापासून ते परस्पर संपर्क अाणि संबंधांच्या जाणिवेपर्यंत! 

हान या शहराच्या नियाेजनकर्त्यांपैकी एक, पीटर कॅलथाॅर्प हे भविष्यातील स्वच्छ शहरांसाठी सात पायाभूत तत्त्वे अमलात अाणण्याचा सल्ला देतात. अवतीभवती ज्या समस्या अाहेत त्या स्वतंत्रपणे जन्म घेत नाहीत, त्यांचा संबंध अापल्या कार्यपद्धतीशीच असताे. पीटर यांच्या सात तत्त्वांपासून प्रेरणा घेत कार्य करत असलेल्या पुण्यातील एका लहानशा सार्वजनिक संस्थेविषयी जाणून घेऊया, जी नव्या पिढीसाठी काही भेटवस्तू देण्याच्या तयारीत अाहे. 

पुण्यातील २६०० फूट उंचीवरील वेताळ टेकडी, शहरातील सर्वात उंच ठिकाणच नव्हे तर न्यूयाॅर्कमधील प्रख्यात सेंट्रल पार्कच्या धर्तीवर त्यास पुण्याचे फुप्फुसदेखील म्हटले जाते. पाच वर्षांपूर्वी २०१२ मध्ये सरकारने टेकड्या अधिग्रहित करून तिथे थीम पार्क इत्यादी विकसित करण्याचा निश्चय केला हाेता. त्यास स्थानिकांकडून कडवा विराेध झाला अाणि सरकारला त्यासमाेर गुडघे टेकावे लागले. स्थानिक स्वायत्त संस्थेला बिल्डर लाॅबीने राजी केले. मात्र त्यांच्यावर दबाव अाणला ताे स्थापनेला अवघे एक वर्ष झालेल्या ‘द डेक्कन जिमखाना परिसर समिती’ ने. म्हणाल तर ही निरुपद्रवी संस्था हाेती, जी मुख्यत: अासपासचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी स्थापण्यात अाली हाेती अाणि अाता पुण्याच्या बहुतेक भागात पर्यावरणविषयक मुद्द्यांवर संघर्ष करणाऱ्या नागरिकांचा सर्वाधिक सक्रिय ग्रुप बनला अाहे. ही संस्था आता केवळ पुण्यालगतच्या टेकड्यांचे संरक्षण करण्यासह अतिक्रमण हटवणे अाणि जमिनी बळकावण्याचा प्रयत्न हाणून पाडणारी संस्था ठरली. तसेच संपूर्ण डेक्कनला परिसर स्वच्छतेचा गाैरवदेखील तिने मिळवून दिला. 

कचरा व्यवस्थापनापासून कामाला सुरुवात करीत वाहतूक, पाणी-वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी, रस्ते अाणि बाजूच्या फरशांची दुरुस्ती, सार्वजनिक उद्यानांची देखभाल, अतिक्रमण, तुम्ही काेणत्याही मुद्द्याचे नाव घ्या, त्यावर ‘डीजीपीएस’ने काम केलेले असणारच. सुरक्षित अाणि स्वच्छ वाॅर्डाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समितीच्या सदस्यांनी पालिकेचे कर्मचारी, वाहतूक पाेलिस, स्थानिक रहिवासी यांच्यासह नगरसेवकांना साेबत घेऊन काम केले. उल्लेखनीय म्हणजे त्यांचे अलिखित घाेषवाक्य ‘समस्यांच्या साेडवणुकीसाठी संबंधित व्यक्ती, संस्थेकडे पाठपुरावा करा; मात्र साैजन्य बाळगा’ या अाशयाचे अाहे. इतकेच नव्हे तर अापल्या आधीच्या पिढीने जसे शहर आपल्याला साेपवले तसेच शहर भावी पिढीकडे सुपूर्द करण्याचा शक्य तितका प्रयत्न करा. हा ग्रुप परिसंवाद अाणि कार्यशाळेच्या माध्यमातून कंपाेस्टिंग अाणि कचरा वेगळा करण्याच्या प्रक्रियेविषयी जागृती करीत असताे. माेकाट जनावरांवरदेखील त्यांनी नियंत्रण अाणले अाहे. सारांश, नैसर्गिक पर्यावरणाची जपणूक हाच या समितीचा हेतू अाहे. पुण्याच्या इतिहासाशी कुणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर ही समिती खपवून घेत नाही. उल्लेखनीय म्हणजे कृषीविषयक वैविध्याची जपणूकदेखील ती करीत अाहे.
 
फंडा असा: जेव्हाभावी पिढीला काही भेटवस्तू देण्याचा मुद्दा येताे तेव्हा त्यांच्यासाठी किती देखणे घर ठेवले अाहे, यापेक्षाही अासपासचे पर्यावरण कसे ठेवले अाहे हे अधिक महत्त्वाचे ठरते. 
 
- एन. रघुरामन, मॅनेजमेंटगुरू 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...