आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा : दिखाव्यापेक्षा प्रत्यक्षात काम नेहमीच महत्त्वाचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडशी संबंधितकोणताही कार्यक्रम असल्यास साधारणत: मी दोन लोकांना विसरत नाही. सार्वजनिक ठिकाणी आपल्या वागणुकीमुळे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ‘हरी ओम हरी’ गाणारी गायिका उषा उथ्थप. त्या नेहमीच आपला प्रफुल्लित स्वभाव आणि जादुई आवाजामुळे ओळखल्या जातात. दया दाखवण्यासाठीही उषा ओळखल्या जातात हे कमी लोकांना माहीत असेल. 

आपल्यापैकी अनेक लोकांनी त्यांना शुक्रवारच्या केबीसी शोमध्ये पाहिले असेल. ज्याचे सूत्रसंचालक अमिताभ होते. इथे या प्रतिभावंत गायिका ट्रान्सजेंडर गौरी सावंतसोबत आल्या होत्या. उषांच्या सांगण्यावरून अमिताभ यांनी रवींद्रनाथ टागोर लिखित सर्वाधिक लोकप्रिय गाणे ‘एकला चालो रे’ गायले. तथापि, उषा गौरीसाठी साडी आणि अमिताभसाठी शाल घेऊन आल्या होत्या हे फार कमी लोकांना माहीत असेल. असो. या लोकांकडून हेच अपेक्षित असते, परंतु मला चांगले आठवते की, याच केबीसी कार्यक्रमात सहा वर्षांपूर्वी कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकणाऱ्या ३५ वर्षीय सुशीलकुमारने शिक्षक पात्रता चाचणी २०१७ उत्तीर्ण केली आहे. पाटण्यापासून १७९ किलोमीटरवरील मोतीहारीतील हनुमान गढीत राहणाऱ्या सुशील कुमारने बिहार माध्यमिक परीक्षा बोर्डातर्फे शुक्रवारी जाहीर केलेल्या निकालामध्ये १४० पैकी १०० गुण मिळवले आहेत. 

तो परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या १६.०७ टक्के विद्यार्थ्यांपैकी एक आहे. ही परीक्षा पहिली ते आठवीपर्यंतच्या सरकारी शाळांमधील कंत्राटी शिक्षकांच्या भरतीसाठी घेण्यात आली होती. त्याच्या या यशाचा जल्लोष साजरा करण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे सुशील पूर्वी चंपारण जिल्ह्यातील कोटोवा तालुक्यातील मचारगावा ग्रामपंचायतीमध्ये सुमारे १०० विद्यार्थ्यांना गेल्या १८ महिन्यांपासून मोफत शिकवत आहे. मात्र, जर ते व्यावसायिक शिक्षक झाले तर आपल्या कामामध्ये आणखी निपुण होतील, असे तिची पत्नी म्हणाली होती. त्यामुळे तो शुक्रवारी व्यावसायिक शिक्षक झाला. मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतर मागासवर्गातील सुशील या प्रवर्गातून अर्ज करू शकला असता. सुशीलने ओपनमधून अर्ज केला होता. कारण लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक कमाईसह तो क्रीमिलेअरमध्ये येतो हा विचार सतत तो करत असे. त्यामुळे इतर अर्जदारांची संधी हिरावून घ्यावी असे त्याला वाटत नव्हते. 

मानसशास्त्रामध्ये पदव्युत्तर झालेला सुशीलकुमार संगणक चालकाचे काम करून दर महिन्याला सहा हजार रुपये कमावत होता. त्याच वेळी २०११ मध्ये तो अमिताभ बच्चन यांच्या शोच्या पाचव्या सीझनमध्ये विजयी ठरला आणि एका रात्रीतून स्टार झाला. तो पाच कोटींचा जॅकपॉट जिंकणारा पहिला स्पर्धक होता. कर भरल्यानंतर त्याने काही पैशातून घर बांधले आणि उर्वरित रकमेची गुंतवणूक केली. सध्या दिल्लीत ट्रान्सपोर्ट बिझनेस, मोतीहारी येथे काही दुकाने आणि फिक्स्ड डिपॉझिटमधून मिळणारे व्याज त्याच्या कमाईचे स्रोत आहेत. तो सतारवादनही शिकत आहे. मोतीहारीतील ग्रामीण भागात बदली व्हावी, असे सुशीलला वाटते, जेणेकरून तो जास्तीत जास्त काळ गरीब विद्यार्थ्यांसोबत घालवू शकेल. 

फंडा असा : दुसऱ्यांसमोरकाहीतरी करून महान व्यक्ती बनता येते, परंतु तुम्ही लोकांच्या माघारी काहीतरी करून महान बनता. तुमची हीच प्रतिमा अधिक काळ कायम राहते. 

- एन. रघुरामन, मॅनेजमेंटगुरू 
raghu@dbcorp.in

(मॅनेजमेंट फंडा एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 वर) 
बातम्या आणखी आहेत...